(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dasara Melava : दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय काय बोलणार? व्हिडीओ जारी करत म्हणाल्या...
Pankaja Munde on Dasara Melava : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर होणार आहे. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे.
Pankaja Munde on Dasara Melava : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर होणार आहे. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचे पंकजा मुंडे सांगत आहेत. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन जारी केला आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपण सर्वजण उद्याच्या कार्यक्रमासाठी उत्सुक आहोत. दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत. तुमचंही ऐकायचं आहे, मलाही बोलायचं आहे. या दोन वर्षात अनेक घटना घडल्या. या दोन वर्षात मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, अनेक संघर्ष, अनेक यश-अपयश याची सर्व कहाणी. तिथून आपण कोणती उमेद घ्यायची आणि भविष्याचा प्रवास कसा करायचा हा भाषणाचा सूर असेल. मी काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष आहे, माझंही लक्ष आहे, कारण मी जे काही बोलते ते स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने बोलते. भगवान बाबांच्या आशिर्वादाने आणि मुंडे साहेबांच्या संस्कारावर आधारीत बोलते. त्यामुळं आपण कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाला उपस्थित राहावं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
Dasara Melava 2021 : सावरगावमधल्या दसरा मेळाव्याची मुंडे समर्थकांकडून जोरदार तयारी
पंकजा मुंडे म्हणाल्या की, इथून आतापर्यंत आपण अनेक संकल्प केले आहेत. मुंडे साहेबांनी अनेक संकल्प केले होते, आपण ते तडीसही नेले. असेच संकल्प करण्यासाठी आपण दरवर्षी तिथं येतो. ती एक उर्जा आहे, एक शक्ति आहे, आपला अभिमान आहे. आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल अशी अपेक्षा आहे. आपण घरातून निघताना आपली शिदोरी घेऊन निघा. पाणी सोबत ठेवा. कार्यक्रमस्थळी आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा. कोरोनाचं संकट टळलं असलं तरी आपण काळजी घ्यायची आहे. आपण मास्क लावूनच यायचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्यामुळं कुणाला होऊ नये याची काळजी घ्यावी.
मेळाव्याची जय्यत तयारी, पंकजा मुंडे काय बोलणार याकडे साऱ्यांच्या नजरा
मागच्या दोन वर्षांपासून सगळे कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने होत होते. कोरोनाच्या संकटामुळे मोठे निर्बंध दसरा मेळाव्यावर आले होते. मात्र यावर्षी मुंबईमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे तर तिकडे पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. तीन वर्षापूर्वी भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला महंत नामदेवशास्त्री यांनी विरोध केला आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगावमध्ये भव्य स्मारक उभारून दसरा मेळावा घेण्याची परंपरा कायम ठेवली. मागच्या वर्षी याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला होता, मात्र यावेळी पंकजा मुंडेंच्या विरोधात प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते. आता पुन्हा दसऱ्याला पंकजा मुंडे सावरगावमध्ये दसरा मेळावा घेणार आहेत त्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक सावरगावला येणार आहेत. खरतर मागच्या दोन वर्षांमध्ये पंकजा मुंडे सोबत बऱ्याच राजकीय घटना घडल्या अगदी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डॉक्टर भागवत कराड यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. मात्र यावेळी प्रीतम मुंडे यांना डावलल्याची भावना कार्यकर्त्यात होती त्यानंतर पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यांच्यावर अन्याय होत असल्याची जाहीर करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठे आरोप केले होते. आता पुन्हा दसरा मेळावा पंकजा मुंडे काय बोलणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात. सध्या सावरगाव मधल्या भगवान भक्ती गडाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. गावकरी मैदानाची साफसफाई करताहेत तर मंदिराच्या तिन्ही भगवान बाबाच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे.
सभागृहाबाबत नियमावली जाहीर ; शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं काय?
दसऱ्याच्या मुहूर्तावर राजकीय मेळाव्यांची परंपरा
दसऱ्याच्या मुहूर्तावर राजकीय मेळाव्यांची परंपरा उद्या पुन्हा एकदा दिसणार आहे. गतवर्षी कोरोनामुळे ऑनलाईन झालेले मेळावे यावर्षी मात्र प्रत्यक्ष होणार आहेत. शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा उद्या मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. एरवी सभागृहात नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास परवानगी नसताना शिवसेनेला मेळावा घेण्याची परवानगी कशी दिली असा सवाल मनसेनं केलाय. पण शिवसेनेनं 50 टक्के उपस्थितीत दसरा मेळावा घेण्याचं जाहीर केलंय. कोरोनाविषयक नियमांचं पालन करून हा मेळावा होईल. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मेळाव्यात मार्गदर्शन करतील, असं शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलंय.