एक्स्प्लोर

पंकजाताईंचा संकल्प ठरला! 12 डिसेंबरला राबवणार 'हा' उपक्रम, व्हिडीओ केला शेअर  

पंकजा मुंडे (Pankaja Munde Letter Viral) या दरवर्षी गोपीनाथ मुंडे (gopinath munde birth anniversary) यांच्या जयंतीदिनी 12 डिसेंबर रोजी एक संकल्प करत असतात. यंदाही त्यांनी एक वेगळा संकल्प केला आहे.

बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde Letter Viral) या दरवर्षी गोपीनाथ मुंडे (gopinath munde birth anniversary) यांच्या जयंतीदिनी 12 डिसेंबर रोजी एक संकल्प करत असतात. यंदाही त्यांनी एक वेगळा संकल्प केला आहे. याबाबत त्यांनी स्वत: त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर यासंदर्भात व्हिडीओ शेअर केला आहे. दरवर्षी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी गोपीनाथ गडावर  वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. मात्र यावर्षी मुंडे समर्थकांना गडावर न येता ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करावी असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे सुद्धा या दिवशी ऊसतोड कामगारांसोबत उसाच्या फडावर असणार आहेत.

पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, यंदा सेवेचा संकल्प करुयात. यावेळी आपण काही वेगळं करुयात. कष्टकरी, मजुरांकडे जा, त्यांची सेवा करा. त्यांना घरातून डबा बनवून नेत खायला घाला, त्यांच्या डब्यातला तुम्ही खा. ज्यांचं मुंडे साहेबांवर प्रेम आहे ते असे कार्यक्रम करतील. आपण केलेल्या उपक्रमाच्या भावना माझ्या सोशल मीडियावर व्यक्त करा. जेव्हा तुम्ही हे काम करत असाल त्यावेळी मी उसतोड कामगारांसोबत हा दिवस घालवणार आहे. हा दिवस कष्टकरी लोकांसाठी साजरा करायचा आहे. हे ज्यावेळी आपण साजरं करत असून त्यापेक्षा मोठा आनंद कोणताही नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 

पत्रात पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, 12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे तीन दिवस आपला वंचितांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतोय याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला, निस्सीम प्रेम करणाऱ्यांनाच जातं! तुमच्या एवढं सच्च, अनोखं नातं माझ्या जीवनात कोणतही नाही. प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामुदायीक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग-दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी अनेक कार्यक्रम आपण केले. अनेक मान्यवर अमित शहा, मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, छत्रपती सर्व गडावर आले. अनेक दु:खी कुटुंबियांना मदत केली. अनेक रुग्णांचे इलाज झाले. खूप आशीर्वाद कमवले. हे आशीर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मूळी, हे चुकीच्या गोष्टी सुधारत असतील, सुधारण्यासाठी नाहीतर त्या गोष्टी आणि प्रवृत्तीशी स्वत:चे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशीर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात.कोणत्याही नात्याविना इतकं प्रेम कसं केलं तुम्ही साहेबांवर आणि काकणभर जास्त माझ्यावर. नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपुलकीविना असणाऱ्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

पंकजाताईंचा संकल्प ठरला! 12 डिसेंबरला राबवणार 'हा' उपक्रम, व्हिडीओ केला शेअर  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवलीBaba Siddique : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यूUddhav Thackeray Full Speech : मोदींची मिमिक्री, RSSला सवाल; उद्धव ठाकरे यांचं दमदार भाषण ABP MAJHABaba Siddique Firing : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर 3 जणांकडून गोळीबार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava : ... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
Embed widget