सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : पंकजा मुंडे
बारा आमदारांचे निलंबन चुकीच्या पद्धतीने झालं होतं हे आज सिद्ध झालं आहे. सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माहविकास आघाडी सरकारवर केली.
बीड : बारा आमदारांचे निलंबन चुकीच्या पद्धतीने झालं होतं हे आज सिद्ध झालं आहे. या निलंबनाबद्दल सुप्रीम कोर्टाने सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे यातून एकच गोष्ट जगासमोर आली आहे की, सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी माहविकास आघाडी सरकारवर (Maharashtra Government ) केली.
बीड शहरातील अंकुशनगर भागात भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले. या प्रवेशद्वाराचे अनावरण आज पंकजा मुंडे यांनी केले. यावेळी त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, "मी 9 महिन्यांची असल्यापासून भाजपचा प्रचार करत आहे. जेव्हा भाजपचा जन्म झाला होता तेव्हा मुंडे साहेबांचं नाव घराघरात होतं. त्यामुळे मुंडे साहेबांनी कमळाचं चिन्ह घराघरात नेऊन पोहोचवलं."
'मी दुसऱ्यासाठी खूप लकी'
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "मी स्वतःसाठी लकी आहे की नाही माहीत नाही. पण मी नक्कीच दुसऱ्यांसाठी लकी आहे. मी ज्यांचा प्रचार करते त्यांचा उमेदवार निवडून येतो, असं लोक म्हणतात. माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा कोणालाही त्रास होत नाही. मी कोणालाही प्लॉट किंवा जमीन मागत नसून आम्हाला लोक जमीन दाखवायला घाबरत नाहीत असे राजकारणी आम्ही आहोत. नाहीतर बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांना लोक आपली जमीन दाखवायला घाबरतात, अशी टीका पंकजा मुंडे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर केली.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण शाळेतच : अजित पवार
- Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 2 लाख 35 हजार 532 रुग्ण, 871 जणांचा मृत्यू
- धक्कादायक... PUBGचं घातकी व्यसन! 14 वर्षाच्या मुलानं अख्ख्या कुटुंबाला गोळ्या घालून संपवलं