एक्स्प्लोर

'भाऊ तुम्ही बांधाल ते तोरण...', भाजपचं चिन्ह हटवत एकनाथ खडसे समर्थकांची बॅनरबाजी

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरासाठी 17 ऑक्टोबरचा मुहूर्त मानला जात होता. मात्र हा मुहूर्त टळल्यानंतर आता 22 तारखेचा मुहूर्त असल्याच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर आता एक पाऊल पुढे टाकत, भाजपचे चिन्ह हटवत, 'भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण...' अशा स्वरूपाची बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चा अधिक जोरात होऊ लागल्या आहेत.

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरासाठी 17 ऑक्टोबरचा मुहूर्त मानला जात होता. मात्र हा मुहूर्त टळल्यानंतर आता 22 तारखेचा मुहूर्त असल्याच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. स्वतः एकनाथ खडसे यांनी मात्र या सर्व विषयावर मौन बाळगले आहे. कोणताही निर्णय झाल्यास तो आपण स्वतः कळवू असं सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र खडसे मुंबईत जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा प्रकारच्या शक्यता पाहता त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे चिन्ह हटवत खडसे यांचे बॅनर आपल्या वाहनावर आणि रस्त्याच्या कडेला उभे केले आहेत. 'भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण', 'भाऊ आम्ही सदैव आपल्या सोबत' असं बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे समर्थकांची बॅनरबाजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

काही दिवसांपूर्वी खडसेंना पक्षांतराबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं होतं की, 'राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला या विषयावर काहीच बोलायचे नाही. नो कमेंट्स'. 'माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत', असेही त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

एकनाथ खडसे मोठ्या काळापासून भाजपवर नाराज आहेत. भाजपमध्ये आपल्याला सातत्यानं डावललं जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. त्यातून ते गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहेत. एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली आहे. मात्र, पक्षाच्या नेत्यांकडून कुठल्याही पद्धतीने विचारणा केली नाही किंवा कारवाई देखील केली नाही. गेल्या काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ले चढवत आहेत.

Eknath Khadse | स्पेशल रिपोर्ट | नाराज एकनाथ खडसे हाती घड्याळ बांधणार का?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Babanrao Taywade on Manoj Jarange Patil: तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget