दैनिक सामना विरोधात देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय संदीप जोशी आक्रमक; संपादका विरोधात मानहानीचा दावा ठोकणार
Sandeep Joshi : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय संदीप जोशी यांनी दैनिक सामना आणि त्याच्या संपादका विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे.
![दैनिक सामना विरोधात देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय संदीप जोशी आक्रमक; संपादका विरोधात मानहानीचा दावा ठोकणार BJP leader and Devendra Fadnavis very close Sandeep Joshi aggressive against Dainik Saamna A claim for defamation against the editor maharashtra marathi news दैनिक सामना विरोधात देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय संदीप जोशी आक्रमक; संपादका विरोधात मानहानीचा दावा ठोकणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/09/366d71a9666c0b062949688702b468931725864164872892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics नागपूर : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devedra Fadnavis) यांचे अत्यंत निकटवर्तीय संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी दैनिक सामना आणि त्याच्या संपादका विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे. आज दैनिक सामना मध्ये नागपूरातील अंभोरा देवस्थान येथील प्रस्तावित विकास कामासंदर्भात निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याची बातमी छापली गेली आहे. त्या बातमीच्या माध्यमातून आमच्या सिद्धिविनायक ट्रस्टची नाहक बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत संदीप जोशी यांनी दैनिक सामना (Dainik Saamana) आणि त्याच्या संपादका विरोधात एक रुपये मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे.
दैनिक सामना आणि त्याच्या संपादका विरोधात एक रुपये मानहानीचा दावा
नागपूर जिल्ह्यातील अंभोरा येथील विविध विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा बोलवल्या होत्या. त्यात तीन वेगवेगळ्या कंत्राटदारांनी त्या निविदा भरल्या असून शक्ती बिल्डकॉन या कंत्राटदाराला संदीप जोशी यांच्या सिद्धिविनायक ट्रस्टनं अनुभव प्रमाणपत्र दिले आहे. नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते आणि वकील मोहनीश जबलपुरे यांनी शक्ती बिल्डकॉन या कंपनीला दगडी बांधकामाचा अनुभव नसतानाही सिद्धिविनायक ट्रस्टने दगडी बांधकामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र दिले आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारावरच शक्ती बिल्डिकाँन अंभोरा येथील विकास कामा संदर्भातली 115 कोटी रुपयांची निविदा भरली. सिद्धिविनायक ट्रस्टने दिलेल्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर शक्ती बिल्डकॉन एवढं मोठं काम मिळवण्याचा प्रयत्न केलं असून ही फसवेगिरी आहे, अशा आशयाची याचिका ही मोहनीश जबलपुरे यांनी नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल केली आहे.
याच सर्व घडामोडीचा आधार घेत दैनिक सामनामध्ये आज बातमी छापण्यात आली. मात्र, सामना मधील बातमी सिद्धिविनायक ट्रस्टची नाहक बदनामी करणारी असून त्याच अनुषंगाने सिद्धिविनायक ट्रस्टचे काम सांभाळणारे भाजप नेते संदीप जोशी यांनी दैनिक सामना आणि त्याच्या संपादका विरोधात मानहानीचा दावा ठोकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)