एक्स्प्लोर

इतर पक्षातील आयात नेत्यांमुळे भाजपच्या अडचणीत वाढ

विद्यमान भाजप आमदार शिवाजी कर्डिले हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. यापूर्वी राष्ट्रवादीतून तीन वेळा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.

मुंबई : 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर भाजपने महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेसोबतची 25 वर्षांची युती तोडून भाजपने प्रत्यक्षात 55 उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षातून आयात केले. सत्तेत आल्यानंतर यातल्याच काहींनी भाजपला चांगलंच अडचणीत आणलं आहे. तर दुसरीकडे पुन्हा शिवसेनेला गोंजारण्याची वेळ भाजपवर आली आहे. विद्यमान भाजप आमदार शिवाजी कर्डिले हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. यापूर्वी राष्ट्रवादीतून तीन वेळा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 2014 साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र अहमदनगरच्या दुहेरी हत्याकांडात खुनाचा कट रचणे आणि एसपी कार्यालय फोडण्याचा गुन्ह्यात त्यांना आज अटक करण्यात आली. यामुळे सत्ताधारी पक्षातल्या आमदाराच्या मुसक्या आवळण्याची वेळ भाजप सरकारवर आली आहे. फेब्रुवारीत अहमदनगरमध्ये उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका फोन संभाषणात अपशब्द वापरल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीपाद छिंदम यांनी या प्रकरणावरुन भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढवली होती. अखेर छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्याची वेळ भाजपवर आली. गेल्या वर्षी विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नींबाबत अपमानजनक वक्तव्य केलं. यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरात टीकेची झोड उठली. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले आणि परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिचारक यांचं निलंबन मागे घेण्यावरुन शिवसेनेसह विरोधकांनी प्रचंड गदारोळ करुन फोन दिवस सभागृह चालू दिले नाही. यामुळे एकटी पडलेली भाजप चांगलीच तोंडघशी पडली. यापूर्वी 2014 ला परिचारक स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून विधानसभा लढले होते. 2016 ला अपक्ष म्हणून सर्वपक्षीय मदतीने परिषदेवर निवडून आले. पुढे ते भाजप पुरस्कृत आमदार झाले. तशी त्यांची अजित पवार यांच्यासोबत असलेली जवळीक सर्वश्रुत आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले डॉ. विजय कुमार गावित यांचा आदिवासी घोटाळा असो किंवा मनसेतून आलेले प्रवीण दरेकर यांचा मुंबै बँक घोटाळा, या अशा आयात नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं अधून-मधून चर्चेचा विषय असतात. यामुळे भाजपने आयात नेत्यांच्या जीवावर सत्ता स्थापन जरी केलं असलं तरी याच नेत्यांची वादग्रस्त कारकीर्द भविष्यात भाजप पतनाचं कारण ठरेल का अशी शक्यता निर्माण झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरूPune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदेAshok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Embed widget