एक्स्प्लोर

रोहित पवार बिनडोक आणि त्यांना सल्ला देणारा बेअक्कल, गोपीचंद पडळकरांची टीका

संघर्ष यात्रा फेल झाली म्हणून काहीतरी स्टंट करायचा .  यात्रा अपयशी ठरली त्यामुळे त्यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला आहे, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

नागपूररोहित पवारांना (Rohit Pawar)  सल्ला देणारा बेअक्कल आहे. संघर्ष यात्रा अयशस्वी झाली म्हणून रोहित पवार स्टंट करत आहेत, अशी टीका  भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopicahand Padalkar)  शरद पवार (Sharad Pawar)  गटाचे आमदार  रोहित पवारांवर  केली आहे. रोहित पवारांनी  संघर्ष बघितला कधी? संघर्ष आणि रोहित पवार यांचा संबंध काय? असा सवाल पडळकरांनी रोहित पवारांना केला आहे. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे

गोपीचंद पडळकर म्हणाले, रोहित पवार बिनडोक माणूस आहे. त्यांना जो सल्ला देतो तो  देखील बेअक्कल आहे. रोहित पवारांनी संघर्ष बघितला कधी?  राज्यात त्यांच्या संघर्ष यात्रेला कुठेच रिस्पॉन्स मिळाला नाही. संघर्ष यात्रा फेल झाली म्हणून काहीतरी स्टंट करायचा .  यात्रा अपयशी ठरली त्यामुळे त्यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे टाळले

पीएचडी करून तरूण मुलं करतात काय? काय दिवे लावतात?, अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी केली.  मी सभागृहात नव्हतो त्यामुळे मला काही माहिती नाही, असे म्हणत उत्तर देणे टाळले आहे.  

स्वागत करू शकत नसाल तर टीका करू नका

शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे सदस्य सचिन अहिरांनी रोहित पवारांच्या यात्रेवर होत असलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. सचिन अहिर म्हणाले, हा स्टंट आहे असे म्हणत असतील तर यांच्या दिंड्या निघाल्या त्याचे काय झाले. तुम्ही स्वागत करू शकत नसाल तर टीका तरी करू नका. एक तरुण संघर्षाची भावना घेऊन उतरतो त्यावेळी त्याचे स्वागत व्हायला हवे.

रोहित पवारांच्या यात्रेवर पोलिसांचा लाठीमार

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्तवातील  युवा संघर्ष यात्रेची (Yuva Sangharsh Yatra) समारोपाची सभा संपल्यानंतर विधानसभेकडे कूच करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. आपल्या मागण्यांसाठी विधानसभेवर धडकणाऱ्या या यात्रेला पोलिसांनी अडवले असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनीही पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या संघर्षात आमदार रोहित पवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget