एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रक्रियेनुसारच निर्णय घेतला, शिंदेंची बाजूच वरचढ ठरेल: देवेंद्र फडणवीस 

Shivsena : अंतिम निर्णयावेळी एकनाथ शिंदे यांचीच बाजू वरचढ ठरेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 

मुंबई: गेल्या 20-25 वर्षांमध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह गोठवून नंतरच त्यावर अंतिम निर्णय दिल्याचा इतिहास आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं मला कोणतंही आश्चर्य वाटलं नाही अशी पहिली प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे. कार्यपद्धतीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाचा (Election Commission  Of India) निर्णय असल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली. 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, "केंद्रीय निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला आहे तो त्यांच्या कार्यपद्धतीला धरुनच दिला आहे. अंतिम निर्णयाच्या वेळी एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) बाजू वरचढ ठरेल अशी अपेक्षा आहे."

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission  Of India) या निर्णयामागे भाजपचा (BJP) हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शिवसेनेने नवीन नावं सांगितली आहेत त्यामागे शरद पवार (Sharad Pawar) असल्याचं सांगितलं जातं. बोलणारे काहीही बोलत राहतील. गेल्या निवडणुकीच्या वेळी मोदींच्या नावावर निवडून आलेत. त्यांचे 18 खासदार आणि 56 आमदार हे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नावावर निवडून आले आहेत. मोदी यांचे नाणे खणखणीत आहे आणि ते कायम राहील."

दहीहंडी उत्सवाच्या वेळी जखमी झालेल्या गोविंदाच्या मृत्यूवर विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही दुर्दैवी घटना आहे. पुढील वर्षी आपण अधिकची काळजी कशी घेता येईल यावर भर देऊ. 

शिवसेनेचं चिन्ह गोठवलं 

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दोन्ही बाजूने करण्यात दावे, सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाने शिवसेनेवर दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली होती. शिंदे गटाने आपल्याकडे 40 आमदार आणि 12 खासदारांचे पाठबळ असल्याचे निवडणूक आयोगाला सांगितले. त्याशिवाय पक्षाचे काही पदाधिकारीदेखील सोबत असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. तर दुसरीकडे पक्षाची कार्यकारणी, संघटनात्मक ताकद आपल्या पाठिशी असल्याचा दावा ठाकरे गटाने केला होता. पक्षाची घटना सर्वोच्च असून त्यानुसार निवडण्यात आलेली कार्यकारणी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे ठाकरे गटाने म्हटले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget