एक्स्प्लोर
Advertisement
अमित शाहांची संपत्ती जाहीर, आता उद्धव ठाकरेंची करणार का? : माधव भांडारी
मुंबई : अमित शाहांनी 2007 मध्ये 5 कोटी 57 लाख एवढी संपत्ती दाखवली होती, तर 2012 च्या विधानसभेला 11 कोटी 77 लाख दाखवली आहे, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची संपत्ती जाहीर करा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांची संपत्ती अगोदर जाहीर करावी, त्यानंतर ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तीबद्दल बोलावं, असं शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले होते. त्यानंतर भाजपकडून अमित शाहांच्या संपत्तीचं प्रतिज्ञापत्र दाखवण्यात आलं.
ठाकरे कुटुंबाची सात बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील कालच्या सभेत उद्धव ठाकरे त्यांची संपत्ती जाहीर करणार का, असा सवाल विचारला होता.
याबाबत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आरोप फेटाळले.
दरम्यान किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अमित शाहांची संपत्ती दाखवली, आता तुमची दाखवा, त्या सात कंपन्यांसोबतचे आर्थिक व्यवहार समोर येण्याची भीती आहे का, असा सवाल सोमय्यांनी केला आहे.
https://twitter.com/KiritSomaiya/status/832190252244664320
संबंधित बातम्या :
‘साहेब संपत्ती घोषित करणार का?’, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
हिंमत असेल तर ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करा : शिवसेना
उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीचं ऑडिट करावं: सोमय्या
उद्धव ठाकरेंचे सात कंपन्यांशी आर्थिक लागेबांधे, सोमय्यांचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement