एक्स्प्लोर

Sharad Pawar EXCLUSIVE: संसदीय राजकारणात भाजपला मदत? मोदींकडून कौतुक, शरद पवारांनी स्पष्ट सांगितले

Sharad Pawar EXCLUSIVE: पंतप्रधान मोदी यांच्याकडून शरद पवार यांचे कौतुक केले जाते. राष्ट्रवादीकडूनदेखील संसदेत काही प्रमाणात मवाळ भूमिका घेतली जाते. यावर पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Sharad Pawar EXCLUSIVE:  संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) भाजपला (BJP) पूरक अशी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करण्यात येतो. तर, दुसरीकडे राज्यातील भाजपचे नेते शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे शरद पवार यांचे कौतुक करतात. एबीपी माझा दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवार यांनी यावर मनमोकळेपणाने भाष्य केले, 

शरद पवार यांनी म्हटले की, एखाद वेळेस आम्ही सभागृहात वेगळी भूमिका घेतली असेल, हे मान्य आहे. काही बाबतीत मतभिन्नता असू शकेल. याचा अर्थ मतभेद नव्हे. मत मांडण्याचे, व्यक्त करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. तो सभागृहात व्यक्तदेखील केला जातो. विरोधकांना एकत्र ठेवण्यासाठी विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याऐवजी सभागृहातून सभा त्याग करणे हे पाऊल चांगले आहे असे पवार यांनी म्हटले. अनेक मुद्यांवर अनेकांची मते, भूमिका वेगवेगळी असतात याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. 

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद या संसदीय राजकारणात मला 54 वर्ष झाले. देशात एवढी वर्ष काम केलेला दुसरा नेता नाही. इतकी वर्ष संसद-विधीमंडळात काम केल्यानंतर काही प्रमाणात आम्हालादेखील अनुभव असेल. माझा दृष्टीकोण असा आहे की, सत्ताधारी-विरोधी पक्षाचा नेता, पंतप्रधान या एक संस्था आहेत. त्यांच्यावर धोरणाच्या अनुषंगाने टीका व्हावी, त्यांच्यावर वैयक्तिक टीका होता कामा नये असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

मविआत जागा वाटपाचे काय?

लोकसभेच्या निवडणुकीसाठी वर्षभराचा काळ उरला आहे. महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षातील जागा वाटपांबाबत चर्चा  अद्याप सुरू झाली नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत शरद पवार यांनी म्हटले की, आघाडीच्या राजकारणात जागा वाटप, खाते वाटप या सहजपणे होत नाही. त्यात दावे होतात. मात्र, चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातील आणि जागा वाटप होईल. जागा वाटप करताना काही जागा सोडाव्या लागतील तर काही जागा या घ्याव्या लागतील. त्याला आघाडीतील लोकांची तयारी असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

फडतूस-काडतूसवर पवारांनी कान टोचले 

राज्यात फडतूस शब्दावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार सामना पाहायला मिळाला. परंतु फडतूस आणि काडतूस शब्दावरुन शरद पवार यांनी सर्वच नेत्यांचे कान टोचले. वैयक्तिक टीकाटिप्पणी करु नका, असे खडेबोल शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना सुनावले. "मला जो महाराष्ट्र माहित आहे, जी संस्कृती माहित आहे, जनतेची मानसिकता माहित आहे, अशा गोष्टी शक्यतो टाळा. वैयक्तिक हल्ला नको, राजकीय विषय घ्या, लोकांचे विषय घ्या, त्यावर आक्रमक व्हा, परंतु वैयक्तिक हल्ला, चिखलफेक ही स्थिती येता कामा नये. हे टाळण्याचं काम जाणीवपूर्व केलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget