विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजप देणार प्रत्युत्तर, शनिवारी भाजप करणार मूक आंदोलन
विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप देखील सज्ज झाली आहे. विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजप प्रत्युत्तर देणार आहे.
BJP Agitation : विरोधी पक्षांकडून भाजपवर सासत्याने मतचोरीचा आरोप केला जात आहे. मतांची चोरी करुन हे सरकार सत्तेत आल्याची टीका विरोधक करत आहेत. उद्या (1 नोव्हेंबर) मुंबईत मतचोरीच्या विरोधात सर्वच विरोधी पक्ष एकत्र येत मोर्चा काढणार आहेत. दरम्यान, विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप देखील सज्ज झाली आहे. विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजप प्रत्युत्तर देणार आहे. साधारण 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान भाजपकडून आंदोलन केलं जाणार आहे.
दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी भाजपचे मूक आंदोलन होणार
विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजप प्रत्युत्तर देणार आहे. उद्या भाजपचे प्रत्युत्तर दाखल मूक आंदोलन होणार आहे. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी भाजपचे मूक आंदोलन होणार आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित राहणार आहेत.
मतचोरीच्या विरोधात सर्वच विरोधी पक्षांनी एकत्रतीत मुंबईत मोर्चा निघणार
दरम्यान, उद्या सर्वच विरोधी पक्षांचा एकत्रतीत मतचोरीच्या विरोधात मुंबईत मोर्चा निघणार आहे. 1 तारखेला सत्याचा मोर्चा काढत आहोत. सत्य लोकांना कळावं आणि असत्य लोकांना कळावं यासाठी मोर्चा काढत आहोत. दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीटपासून मोर्चाला सुरूवात होईल, मेट्रो सिनेमा मार्गे महापालिका गेटपर्यंत हा मोर्चा जाईल, अशी माहिती शिवसेना नेते तथा आमदार अनिल परब यांनी दिली आहे. मतचोरी बाबत आंदोलन पार पडल्यानंतर आम्ही पुढील दिशा जाहीर करणार आहोत. आम्ही ज्या मागण्या आयोगाकडे केल्या होत्या, त्याबाबत आम्ही मोर्चामध्ये बोलणार आहोत, असेही परब यांनी सांगितले. जोपर्यंत दुबार मतदार बोगस मतदार मतदार याद्यातून वगळली जात नाही आणि मतदार यादीतील घोळ राज्य निवडणूक आयोगाकडून बाजूला केला जात नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्यावर विरोधक ठाम आहेत. 1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर अधिक तीव्रतेने या विरोधात ठाकरे शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इतर विरोधी पक्ष या विरोधात एकत्र भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळं उद्याच्या विरोधकांच्या मोर्चाला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, या मोर्चा प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप देखील उद्या मुंबईत आंदोलन करणार आहे. सरकारच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी : केळाला मत दिलं पण गेलं कलिंगडला, राज ठाकरेंच्या मेळाव्यात EVM घोटाळ्याचा LIVE डेमो

























