एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बाहुबली, रावणनंतर आता चर्चा 'हिंदकेसरी थाळी'ची
नाशिकचे हिंद केसरी हॉटेल हे सध्या नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलं आहे. कारण नविन वर्षात त्यांनी खव्वयांसाठी खास करून नॉन व्हेज प्रेमींसाठी एक खास थाळी तयार केली आहे.
![बाहुबली, रावणनंतर आता चर्चा 'हिंदकेसरी थाळी'ची big non veg hind kesari thali in nashik बाहुबली, रावणनंतर आता चर्चा 'हिंदकेसरी थाळी'ची](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/02203359/nashik.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नॉन व्हेजसाठी बाहुबली थाळी, रावण थाळी असे अनेक प्रकार खरं तर तुम्ही ऐकले असतील मात्र आता नॉन व्हेज प्रेमींसाठी हिंद केसरी ही एक नविन थाळी महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी थाळी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
नाशिकचे हिंद केसरी हॉटेल हे सध्या नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलं आहे. कारण नविन वर्षात त्यांनी खव्वयांसाठी खास करून नॉन व्हेज प्रेमींसाठी एक खास थाळी तयार केली आहे. या थाळीची किंमत तब्बल पाच हजार रुपये आहे.
हिंद केसरी या नावातच जसा रुबाब आहे तसाच तो या थाळीतही आहे. नाशिकच्या मखमलाबाद जवळील हिंद केसरी हे हॉटेल सध्या सर्वत्रच चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या थाळीची किंमत पाच हजार रूपये आहे. या थाळीत उकड सुप, 8 पापलेट, 8 सुरमई, 25 कोळंबी फ्राय, 20 रस्सा कोळंबी, 8 चिकन लेग पिस, चिकन करी, सुके चिकन, सुके मटण, खिमा, 8 ज्वारीच्या भाकरी, 8 बाजरीच्या भाकरी, 8 तांदळाच्या भाकरी, 16 चपाती, 24 सागोती वडे, सोलकढी, झिंगा चटणी, कोळंबी रस्सा, खेकडा रस्सा आणि भात यांचा समावेश आहे. ही थाळी उचलायला दोन माणसेही कमी पडतात.
या थाळीचा आस्वाद घेण्यासोबतच ही जंबो थाळी आहे तरी कशी हे बघण्यासाठी नाशिककर येथे गर्दी करत आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी थाळी असल्याचा दावा हॉटेल चालकांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही थाळी जर आठ लोकांनी संपवली तर त्या आठ लोकांना महिनाभर मोफत जेवण या हॉटेलकडून देण्यात येणार आहे. मात्र दुसरीकडे जर ताटात अन्न शिल्लक राहिल्यास पन्नास रुपये दंडही आकारला जाणार आहे. खरं तर भारतीय कुस्ती क्षेत्रात 'हिंद केसरी' हा एक मानाचा आणि प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. मात्र हेच नाव या थाळीला का देण्यात आलं? असा प्रश्न आता तुम्हाला नक्कीच पडला असेल मात्र यामागे या हॉटेल मालकाच्या वडिलांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करण्याचा या हॉटेल मालकाचा प्रयत्न असून त्यांच्या सर्व परिवारातील सदस्यांचा मोठा हातभार आहे.
कोल्हापुरी जेवणाची चव नाशिककरांनाही अनुभवता यावी मग तो तांबडा-पांढरा रस्सा, चिकनचा काळा रस्सा असो किंवा कोंबडी वडे यासोबतच संपूर्ण कुटुंबाने, मित्र मंडळींनी एकाच ताटात रुचकर जेवणाचा पोटभर आनंद लुटावा हा या हिंद केसरी थाळी तयार करण्यामागील उद्देश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)