ब्रेकऐवजी चुकून रेस दाबला, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारची दुचाकीला जोरदार धडक, दोन जण जखमी
भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात एका बेफिकीर कारचालकामुळx भीषण अपघात घडला आहे. वळण घेताना कार चालकाने ब्रेकऐवजी चुकून रेस दाबल्याने कार अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
Bhiwandi Accident : भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात एका बेफिकीर कारचालकामुळं भीषण अपघात घडला आहे. वळण घेताना कार चालकाने ब्रेकऐवजी चुकून रेस दाबल्याने कार अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तसेच एका पादचारीला गंभीर दुखापत झाली असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचा हा थरार जवळच्या इमारतीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
घटनेदरम्यान कारने दुचाकीवरील दोन व्यक्तींना आणि पादचारीला उडवले. अपघाताचा हा थरार जवळच्या इमारतीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, पादचारी इसमाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सध्या या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, बाप-लेकीचा जागीच मृत्यू
ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik highway) डोहळे गावाजवळ साईधाम लॉजिस्टिकसमोर भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राजेश अधिकारी (वय 39) व त्यांची मुलगी वेदिका अधिकारी (वय 11) यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही भिवंडी तालुक्यातील सापे गावातील नातेवाईकांकडे देवदर्शनासाठी आले होते व घरी परतत असताना हा अपघात घडला. या अपघातामुळे शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात गणेशोत्सवाच्या काळात शोककळा पसरली आहे. मृतदेह पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले असून, या घटनेचा अधिक तपास पडघा पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























