एक्स्प्लोर
Advertisement
भिऱ्यात भडका, देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद!
रायगड जिल्ह्यातील भिरा इथं सोमवारी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
मुंबई: राज्यभरात उन्हाचा प्रकोप वाढत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र उन्हाने लाही लाही होत आहे.
रायगड जिल्ह्यातील भिरा इथं गेल्या 24 तासात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. भिऱ्यातील कालचं तापमान 45 अंश सेल्सियस इतकं होतं. स्कायमेटने याबाबतची माहिती दिली.
भिऱ्यात रविवारी 43.5 अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवण्यात आलं.
गेल्या वर्षी 28 मार्चला भिरा इथलं तापमान हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजेच 46.5 इतकं होतं. त्यावेळी वेधशाळेची अनेक पथकं भिरा इथं दाखल झाली होती.
त्यानंतर आता पुन्हा एकदा भिरा इथं गेल्या वर्षीची प्रचिती येत आहे.
मुंबईही हॉट
मुंबईचं रविवारचं तापमान तब्बल 8 अंशाने वाढून ते 41 अंशापर्यंत पोहोचलं. हे 2011 नंतर सर्वात जास्त तापमान आहे.
केवळ मुंबईच नाही तर उष्णतेची झळ संपूर्ण राज्याला बसली आहे. उष्णतेच्या दाहकतेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील तापमानने चाळीशी ओलांडली आहे.
ब्रम्हपुरी, अकोला वर्धा, सोलापूर, परभणी इथं तापमान जवळपास 40 अंश सेल्सियसच्या आसपास नोंदले गेले. तर अहमदनगर, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे, सांगली, सातारा, वेंगुर्ला येथेही तापमान 37 ते 39 अंश होते.
देशातील टॉप 10 हॉट शहरं
- भिरा (रायगड), महाराष्ट्र – 45 अंश सेल्सियस
- पोरबंदर – गुजरात – 42.5 अंश सेल्सियस
- सुरत – गुजरात – 41.8 अंश सेल्सियस
- सुरेंदरनगर – गुजरात – 41.3 अंश सेल्सियस
- भूज – गुजरात – 41.2 अंश सेल्सियस
- महुवा – गुजरात – 41.2 अंश सेल्सियस
- अहमदनगर – महाराष्ट्र – 41.1 अंश सेल्सियस
- कांडला – गुजरात – 41.0 अंश सेल्सियस
- फलोदी – राजस्थान - 41.0 अंश सेल्सियस
- वेरावल – गुजरात - 40.8 अंश सेल्सियस
भिरा पुन्हा तापलं, तापमान 45.5 अंशावर!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement