Bhaskar Jadhav : संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना भास्कर जाधवांचा कडक इशारा; म्हणाले, शिवसेना अडचणीत असताना..
गुहागरमध्ये जास्त प्रचाराची गरज नाही, निवडणुकीच्या राजकारणात मी पणा चालत नाही, नम्रपणा असावा लागतो. गुहागरमधून सत्तर टक्के मतदान अनंत गीते यांना मिळालेलं असेल, असे भास्कर जाधव म्हणाले.
Bhaskar Jadhav : गेली चार दिवस माझ्या नावाने माझ्या नावाने चुकीच्या चर्चा सुरु आहे. पक्षाने मला नेता केलं असून मी फक्त नावापुरता नेता नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी भूमिका मांडताना सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. भास्कर जाधव म्हणाले की, तुम्ही म्हणत असाल तर मी इथेच बसतो, मी फक्त निवडणुकीसाठी येतो असे नाही. कोरोना काळात केलेलं काम वाया जाणार आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. सुसंस्कृत आणि स्वच्छ पार्टी म्हणून मिरवणाऱ्या भाजपने गुहागरमध्ये माझ्याबद्दल काय भाषा वापरली?? अशी विचारणा त्यांनी केली.
गुहागरमध्ये जास्त प्रचाराची गरज नाही, निवडणुकीच्या राजकारणात मी पणा चालत नाही, नम्रपणा असावा लागतो. गुहागरमधून सत्तर टक्के मतदान अनंत गीते यांना मिळालेलं असेल, असे भास्कर जाधव म्हणाले.
भाजपचे चोर खोटे सांगत आहेत
ते पुढे म्हणाले की, ती भाषा आठवा आणि हा उमेदवार भाजपचा आहे म्हणून प्रचार करा. ही निवडणूक देश वाचवण्याची, देश वाचवण्याची आणि पक्ष चोरणाऱ्या चोरांना जेलमध्ये टाकण्याची असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, भाजपचे चोर खोटे सांगत आहेत. भास्कर जाधवांनी आम्हाला पाठवला असा अपप्रचार सुरू आहे. निवडणूक हलक्यात घेऊ नका, असेही आवाहन त्यांनी केली. यावेळी डेमो मशीनवरून भास्कर जाधव यांनी जिल्हा प्रमुखांना सुद्धा सुनावले. ते म्हणाले की, निवडणूक जवळ आली तरी डेमो मशिन्स बाहेर नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या