(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा विदर्भातील आज दिसरा दिवस, दुपारी एक वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा अकोला (Akola) जिल्ह्यात दाखल झाली आहे. सकाळी सहा वाजता पातूर येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे.
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज विदर्भातील (Vidarbha) तिसरा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा 11 वा दिवस आहे. आज ही यात्रा अकोला (Akola) जिल्ह्यात असून सकाळी सहा वाजता पातूर येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. वाळेगाव मार्गे ही यात्रा बाग फाटा इथे पोहोचणार आहे. बाळापूर तालुक्यातील बाग फाटा इथे आज यात्रेचा मुक्काम असणार आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे. अकोला जिल्ह्यातील राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव सहभागी झाले आहेत.
राहुल गांधींच दुपारी एक वाजता पत्रकार परिषद
राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा 71 वा दिवस असून महाराष्ट्रात या यात्रेचा 11 वा दिवस आहे. राहुल गांधींच्या यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या ही यात्रा विदर्भातील अकोला जिल्ह्यात दाखल झाली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून या यात्रेला अकोल्यातील पातूर येथून सुरुवात झाली आहे. वाळेगाव मार्गे ही यात्रा बाग फाटा इथे पोहोचणार आहे. आज अकोल्यामध्ये, दुपारी एक वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. सावरकरांवर टीका केल्यानंतर गांधी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, या यात्रेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव सहभागी झाले असून, यात्रेदरम्यान ते राहुल गांधी यांच्या चर्चा करत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
उद्या शेगावमध्ये राहुल गांधींची जाहीर सभा
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) येथे शुक्रवारी सायंकाळी राहुल गांधींनी जंगी सभा होणार आहे उद्या राहुल गांधी शेगावातील संत गजानन महाराजांच्या समाधीच दर्शन घेऊन येथील सभेला संबोधित करणार आहे. या सभेची आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सभेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळं सभेच्या ठिकाणी आणि शेगावात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या शेगाव येथील सभेची तयारी अंतिम टप्प्यात; सभेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त