एक्स्प्लोर
गावगुंडांची दहशत, महाराष्ट्राच्या मांझीवर गाव सोडण्याची वेळ
अहमदनगर : महाराष्ट्राचे मांझी म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी आपल्या गावासाठी अख्खा डोंगर पोखरून रस्ता केला, त्याच भापकर गुरुजींनी जेव्हा गावात दारुबंदीसाठी पुढाकार घेतला, तेव्हा गावगुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
एवढं होऊनही पोलिसांनी फक्त एका आरोपीला अटक केली. भापकर गुरुजींनी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांना सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही.
अहमदनगर जिल्ह्यात दारुचं एवढं साम्राज्य कुणाच्या जीवावर फोफावतंय. याचविषयी एबीपी माझाने भापकर गुरुजी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी बातचीत केली.
‘’... अन्यथा गाव सोडण्याशिवाय पर्याय नाही’’
समाजसेवा करणाऱ्या 85 वर्षांच्या व्यक्तीवर गावगुंडांनी हल्ला केला. तरीही दुर्दैवं असं की या हल्लेखोरांपैकी केवळ एकाला अटक झाली आहे, तर बाकी सर्व जण गावात मोकाट फिरत आहेत. व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेतला, एवढाच भापकर गुरुजींचा अपराध होता. त्यामुळे गावगुडांनी त्यांच्यावर हल्ला केला.
‘’गावातील व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केले. या जनजागरुतीला चांगलं यशही आलं. मात्र काही दारु विक्रेत्यांचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनाही दुसरा काही व्यवसाय करता येईल, असं सुचवलं. पण त्यांनी न जुमानता माझ्यावर हल्ला केला. दुर्दैवं असं की हल्ला करण्यात चुलत भावाचाच हात होता. यापुढे सुरक्षा दिली नाही, तर गावात राहणं अवघड होणार आहे. त्यामुळे सुरक्षा द्या, अन्यथा गाव सोडण्याशिवाय पर्याय नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर अण्णांना भेटलो, त्यांनीही पोलीस अधिक्षकांना सुरक्षा देण्याबाबत विनंती केली. हल्ला करणाऱ्या केवळ एकाला अटक झाली आहे. सगळे जण गावात मोकाट फिरत आहेत’’, अशी व्यथा भापकर गुरुजींनी मांडली.केवळ महसुलाचा विचार करु नका, युवाशक्ती सांभाळा : अण्णा हजारे
''समाजसेवा करणाऱ्या 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीला मारहाण होणं हे दुर्दैवं आहे. विकास करायचा असेल तर प्रशासन, अधिकारी आणि समाजासाठी काही तरी करत असलेल्या व्यक्तींनी हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे. दारुबंदीच्या बाबतीत फक्त महसुलाचा विचार केला जातो. मात्र देशाचं भविष्य असलेल्या युवाशक्तीचा विचार केला जात नाही. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. देशातील युवाशक्ती वाचणं गरजेचं आहे. त्याची तुलना पैशात होऊ शकत नाही'', असं म्हणत अण्णांनी दारुबंदीविषयी असलेल्या उदासीनतेविषयी खंत व्यक्त केली.पाहा व्हिडिओ :
संबंधित बातमी : महाराष्ट्राच्या मांझीवर हल्ला, भापकर गुरुजींना गावगुंडांची मारहाण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement