दुसऱ्या विवाहासाठी पती चढला बोहोल्यावर अन् पहिली पत्नी पोहोचली विवाहस्थळी, भंडाऱ्यातील नवरोबाची राज्यभर चर्चा
Bhandara News Update : खेमराज याची पहिली पत्नी, मलगा आणि नातेवईक विवाहस्थळी पोहोचल्यानंतर तेथे एकच फिल्मी स्टाईल ड्रामा सुरू झाला. पहिल्या पत्नीला बघताच नवरोबासह विवाहासाठी उपस्थित असलेल्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
Bhandara News Update : पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी करण्यासाठी बोहल्यावर चढलेल्या नवरोबाचा मुंबईत होणारा विवाहाचा डाव पहिल्या पत्नीनं उधळून लावलाय. यातील दुसऱ्या विवाहाच्या तयारीत असलेला पतिदेव हा भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील असून पाहिल्या पत्नीनं आपल्या नातलगांसह मुंबई गाठत हा विवाह सोहळा उधळून लावलाय. खेमराज बाबुराव मुल (40 रा. मासळ ता. लाखांदूर जि. भंडारा ) असे दुसऱ्या विवाहाच्या बोहल्यावर चढलेल्या नवरोबाचं नाव आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात मुंबईच्या कल्याण (पूर्व) कोळसेवाडी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोघांच्या भांडणात विवाहासाठी आलेल्या वऱ्हाड्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
खेमराज ह पेंटिंगचा व्यवसाय करतो. दुसरा विवाह करण्यासाठी त्याने मुंबई गाठल्याची कुणकुण पाहिल्या पत्नीला लागली. विशेष म्हणजे, दोघांचही घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात पोहोचलं असून अजून त्यावर निकाल लागलेला नसताना पतीने दुसऱ्या विवाहाचा डाव रचला होता. मुंबईत विवाह होत असल्याची माहिती मिळताच पहिली पत्नी, मुलगा आणि नातलग हे विवाहस्थळी पोहचले.
आणि सुरू झाला फिल्मी स्टाईल ड्रामा
खेमराज याची पहिली पत्नी, मलगा आणि नातेवईक विवाहस्थळी पोहोचल्यानंतर तेथे एकच फिल्मी स्टाईल ड्रामा सुरू झाला. पहिल्या पत्नीला बघताच नवरोबासह विवाहासाठी उपस्थित असलेल्यांची चांगलीच भंबेरी उडाली. यानंतर पहिल्या पत्नीने कोळसेवाडी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून दुसरा विवाह करण्याच्या तयारीत असलेल्या खेमराज विरुद्ध गुन्हा दाखल झाला. या विवाहाची भंडाऱ्यात आता जोरदार चर्चा रंगली आहे.
पहिला प्रेम विमविवाह
खेमराज हा मूळचा भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मासळ गावातील रहिवासी आहे. त्याचा 15 वर्षांपूर्वी त्याच्याच गावातील मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस दोघांमध्ये सर्वकाही अलबेल होते. या दोघांना एक मुलगा देखील आहे. परंतु, लग्नाच्या काही दिवसानंतर दोघांमध्ये सतत खटके उडू लागले. त्यामुळे खेमराज याने पत्नीविरोधात न्यायालयात दावा दाखल करून तिच्यापासून घटस्फोटाची मागणी केली. त्यामुळे हे हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. असे असतानाच त्याने दुसऱ्या लग्नाची तयारी केली. त्याने ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील मुलीसोबत लग्न करण्याचे ठरवले. तग्नाची तारीख देखील पक्की झाली. लग्नमंडप सजला, काही वेळातच लग्न होणार होता. परंतु, तोच पहिली पत्नी लग्नमंडपात पोहोचला आणि सर्वच खेळ फसला.