![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'मी मोदींना मारु शकतो' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य, व्हिडीओ होतोय व्हायरल
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल ते वक्तव्य केलं नसून भंडाऱ्यातील गावगुंडाबाबत केलं आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
!['मी मोदींना मारु शकतो' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य, व्हिडीओ होतोय व्हायरल Bhandara Congress president nana patole on modi video goes viral 'मी मोदींना मारु शकतो' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य, व्हिडीओ होतोय व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/11/0410c586429200968b082ec86a7b7d61_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भंडारा : जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या.रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले आहे. या संबंधिचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
हा व्हिडीओ रात्रीच्या वेळचा आहे. या प्रचाराच्या दरम्यान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भोवती लोकांचा गराडा आहे. त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणतात की, 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.' नाना पटोलेंचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले म्हणाले की, "भंडारा जिल्ह्यात मोदी असं टोपणनाव असलेला एक गावगुंड आहे. त्या गुंडाबाबत बोलताना मी ते वक्तव्य केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ते नाही."
दरम्यान नाना पटोलेंच्या या वक्तव्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचा पंजाबमध्ये ताफा अडवल्याच्या घटनेचा संदर्भ देत टीका केली आहे. ते म्हणाले की, 'पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं चाललं तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते.'
महत्त्वाच्या बातम्या :
- ST Strike : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, कामगार न्यायालयाचा निर्वाळा
- होय, आमच्यात मतभेद होते, पण... एन डी पाटलांच्या आठवणीने शरद पवारांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या
- बेळगावमध्ये का साजरा केला जातो हुतात्मा दिन? 17 जानेवारी 1956 ला नेमकं काय घडलं होतं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)