एक्स्प्लोर

वीकेंडचा प्लॅन करताय? राज्यातली ही सुंदर ठिकाणं पाहा

उन्हाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्रात या वीकेंडमध्ये प्लॅन करता येईल, अशी काही थंड हवेची ठिकाणं आणि सुंदर पर्यटनस्थळं आहेत, जिथे तुम्हाला जाता येईल.

मुंबई : या महिन्याच्या शेवटी मोठा वीकेंड आहे. 28 एप्रिलपासून ते 1 मेपर्यंत सलग चार दिवस सुट्ट्या असल्यामुळे पर्यटनस्थळांवर गर्दी होणार आहे. उन्हाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्रात या वीकेंडमध्ये प्लॅन करता येईल, अशी काही थंड हवेची ठिकाणं आणि सुंदर पर्यटनस्थळं आहेत, जिथे तुम्हाला जाता येईल. 28 एप्रिलला चौथा शनिवार, 29 एप्रिलला रविवार, 30 (सोमवार) एप्रिलला बुद्ध पौर्णिमा आणि 1 मे (मंगळवार) रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे. या चार दिवसात आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही फिरायला जात असाल, तर पैशांची अडचण येऊ नये यासाठी आतापासूनच काळजी घ्या. मालवण : कोकणाचं सौंदर्य अनुभवणं हा प्रत्येक पर्यटकासाठी सुखद क्षण असतो. त्यापैकीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण एक आहे. मालवणजवळ असणारे सुंदर समुद्र किनारे आणि निळाशार समुद्र पर्टकांना एक आनंददायी अनुभव देतो. मालवणजवळील भोगवे बीच हा पर्यटकांसाठी चांगला पर्याय आहे. वीकेंडचा प्लॅन करताय? राज्यातली ही सुंदर ठिकाणं पाहा कोल्हापूर, अंबा घाट : खाद्य संस्कृती अनुभवण्यासाठी कोल्हापूरसारखं दुसरं ठिकाण नाही. कोल्हापूरपासून पुढे कोकणातही जाऊ शकता. मात्र कोकणात जाताना अंबा घाटाजवळ वन विसावा हे रिसॉर्ट आहे, जे निसर्गरम्य वातावरण, शांतता आणि एकांत अनुभवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाताना अंबा घाटात हे रिसॉर्ट आहे. वीकेंडचा प्लॅन करताय? राज्यातली ही सुंदर ठिकाणं पाहा महाबळेश्वर-पाचगणी : या वीकेंडला तुम्हाला उन्हाच्या झळांपासून स्वतःला वाचवायचं असेल, तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सुंदर पर्याय आहे. त्याजवळच पाचगणीला देखील तुम्ही जाऊ शकता. वीकेंडचा प्लॅन करताय? राज्यातली ही सुंदर ठिकाणं पाहा चिखलदरा : देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये विदर्भातील काही शहरं आहेत. मात्र या विदर्भात चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण पर्यटकांसाठी एक पर्वणी आहे. वीकेंडचा प्लॅन करताय? राज्यातली ही सुंदर ठिकाणं पाहा औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबादला जाण्याचा पर्याय चांगला आहे. शहरातील पानचक्की, बीबी का मकबरा ही ठिकाणं तर आहेतच. शिवाय औरंगाबादपासून जवळच ऐतिहासिक अजिंठा-वेरुळच्या लेण्याही तुम्ही पाहू शकता. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण औरंगाबादपासून 25 किमी अंतरावर आहे. वीकेंडचा प्लॅन करताय? राज्यातली ही सुंदर ठिकाणं पाहा माथेरान : मुंबईकरांसाठी माथेरान हा चांगला पर्याय आहे. मुंबईपासून साधारणपणे तीन तासांच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण उन्हाच्या तडाख्यापासून तुमची काही प्रमाणात सुटका करतं आणि पर्यटनाचा चांगला अनुभवही देतं. माथेरानची राणी समजली जाणाऱ्या मिनी ट्रेनचा प्रवासही तुम्ही करु शकता. वीकेंडचा प्लॅन करताय? राज्यातली ही सुंदर ठिकाणं पाहा लोणावळा : मुंबई आणि पुणेकरांसाठी लोणावळा हे पर्यटनाचं जवळचं ठिकाण आहे. जवळच खंडाळा, लोहगड किल्ला, राजमाची अशी ठिकाणंही पाहता येतात. चार दिवसांचा प्लॅन असेल, तर पुढे महाबळेश्वर किंवा इतर ठिकाणी जातानाही लोणावळ्याला जाणं शक्य आहे. वीकेंडचा प्लॅन करताय? राज्यातली ही सुंदर ठिकाणं पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Vs Sanjay Shirsat : Eknath Shinde यांच्या बॅगेत नेमकं काय? राऊत - शिरसाटांमध्ये खडाजंगी!Shrirang Barne on Maval Lok Sabha Elections : मावळमध्ये फेर मतदान होणार?श्रीरंग बारणेंची मोठी मागणी!Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Embed widget