एक्स्प्लोर
कलबुर्गींच्या हत्येप्रकरणी एकाला अटक, आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी
कन्नड लेखक आणि विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी बेळगावातील एका तरुणाला कर्नाटक एसआयटीने अटक केली आहे.
बेळगाव : धारवाड येथील लेखक आणि विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी बेळगावातील एका तरुणाला कर्नाटक एसआयटीने अटक केली आहे. प्रवीण प्रकाश चतुर (27) असे या अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो शहापूर येथील कचेरी गल्ली येथील रहिवासी आहे. अटक केल्यानंतर प्रवीणला धारवाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सहा महिन्यांपूर्वी एसआयटीने चौकशीसाठी प्रवीणला ताब्यात घेतले होते. परंतु चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले होते. परंतु यावेळी त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची कोठडीदेखील सुनावली आहे. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015 रोजी धारवाडच्या कल्याण नगरमध्ये त्यांच्या घराजवळ हत्या झाली होती. दुचाकीवरून आलेल्या बंदुकधारी व्यक्तींनी गोळ्या झाडून डॉ. कलबुर्गी यांची हत्या केली होती.
कलबुर्गी यांनी मूर्ती पूजेसंबंधी आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असे याप्रकरणात याआधी अटक केलेल्या आरोपीने सांगितले होते. जून 2014 मध्ये अंधश्रद्धाविरोधी विधेयकाबाबत चर्चा सुरु होती. तेव्हा कलबुर्गी यांनी लेखक यू.आर.अनंतमूर्ती यांच्या लेखनाचा संदर्भ देत मूर्ती पूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केले होते. त्या वक्तव्यामुळे कलबुर्गी यांना हिंदूविरोधी ठरवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, असे आरोपीने सीआयडीला तपासादरम्यान सांगितले होते.
कलबुर्गींविषयी...
कलबुर्गी यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील यारागल गावात 1938 मध्ये झाला होता. कर्नाटक विद्यापीठाचे ते माजी कुलगुरु होते. केंद्र सरकारने डॉ. कलबुर्गी यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. याबरोबरच त्यांना कर्नाटक सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार, नृपतुंगा पुरस्कार आणि पांपा पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement