एक्स्प्लोर
महामार्गालगतचे 200 मीटर आतील सर्व बार आजपासून बंद
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महामार्गालगत असलेले 200 मीटर आतील सर्व बार, बियर शॉप आणि दारु दुकानं आजपासून बंद होणार आहेत. महामार्गालगत असलेल्या जवळपास 15 हजार बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. मात्र यासाठीही काही निकष लावण्यात आले आहेत.
ज्या गावाची लोकसंख्या 20 हजाराच्या आत आहे, त्याठिकाणी सगळ्या राष्ट्रीय, राज्य महामार्गापासून 220 मीटर अंतरावरील बार बंद होणार आहेत. तसंच बियर शॉप , दारु दुकानही आजपासून कायमची बंद होणार आहेत.
20 हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात हे अंतर 500 मीटर असेल. त्यामुळे 20 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमधील मद्यविक्रेत्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे राज्याचं सुमारे 7 हजार कोटी उत्पन्न बुडणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement