एक्स्प्लोर
आर्चीने उद्घाटन केलेल्या वायफाय सेटची बीडकरांकडून तोडफोड
बीडः 'सैराट'फेम रिंकू राजगुरुच्या हस्ते दोन दिवसांपुर्वीच मोठ्या थाटात मोफत वायफाय सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र फुकट्या वायफाय युझर्सचा त्रास वाढल्यामुळे नागरिकांनी एक अॅक्सेस पॉईंटच तोडून टाकला आहे.
बीड नगरपालिका आणि रिलायन्स यांनी शहरात मोफत वायफाय सेवेचा शुभारंभ केला आहे. मात्र फुकट्या युझर्सचा नागरिकांना रात्री बेरात्री त्रास सहन करावा लागत आहे. संतप्त नागरिकांनी ही सेवाच तोडण्याचा प्रयत्न केला.
का केली तोडफोड?
वायफाय युझर्सचे टोळके अॅक्सेस पॉईंट असलेल्या ठिकाणी रात्रभर ठिय्या घालतात. त्यामुळे या टवाळखोरीचा नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांनी अॅक्सेस पॉईंटचे बॉक्स तोडून काही ठिकाणचे वायर टाकले आहेत. त्यामुळे काही काळासाठी इंटरनेट सेवा ठप्प झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement