एक्स्प्लोर
Advertisement
प्रेमप्रकरणातून तरुणाची शेंदूर फासून गावभर धिंड
बीड जिल्ह्यातील शिरुर (कासार) तालुक्यातील आर्वी इथं सोमवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली.
बीड: प्रेम प्रकरणातून मुलीला पळवून नेल्याच्या आरोपातून, मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्याचे कपडे फाडून, त्याला गुलाल, शेंदूर फासून त्याची गावातून धिंड काढण्यात आली.
बीड जिल्ह्यातील शिरुर (कासार) तालुक्यातील आर्वी इथं सोमवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी हस्तक्षेप करत, पीडित तरुणाची सुटका केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
याबाबत तरुणाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, -
आर्वी येथील 25 वर्षीय तरुणाचं, वर्षभरापासून गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. हे दोघे 25 एप्रिल रोजी रात्री 9 च्या सुमारास मोटारसायकलवरुन औरंगाबादला पळून गेले.
त्यानंतर ते दोघे पुणे, कोल्हापूर, पुणे आणि पुन्हा औरंगाबाद असे फिरले. मग 29 एप्रिलला ते दोघे औरंगाबादमध्ये नक्षत्रवाडी येथील मित्राच्या घरी थांबले. त्याची कुणकुण लागल्याने, मुलीचे कुटुंबीय दुपारी चारच्या सुमारास दोन गाड्या घेऊन तिथे पोहोचले.
त्यांनी दोघांनाही एका गाडीत घालून औरंगाबादबाहेर आणले. वाटेत त्यांनी त्या तरुणाला हाताने आणि चपलाने बेदम मारहाण केली.
मग त्यांनी मुलीला रस्त्यातच एका नातेवाईकाच्या घरी सोडले आणि तरुणाला घेऊन नारायणवाडी येथे आले. तोपर्यंत रात्रीचे दीड वाजले होते.
तिथे त्या तरुणाला मुलीच्या मामाच्या शेतातील झाडाल बांधून, लिंबाच्या फोकाने जबर मारहाण केली. त्याला तसंच रात्रभर डांबून ठेवलं. इतकंच नाही तर सकाळी 6 वाजता ते तरुणाला घेऊन सर्वजण आर्वी-निमगाव रस्त्यावरील पुलावर आले.
तिथे गाडीतून खाली उतरवून त्यांनी त्या तरुणाचे कपडे काढले. त्याचे हात पाठीमागे बांधून त्याला आर्वी येथील बाजारतळावर, वेशीवर आणून उभे केले. त्याच्या डोक्यावर आणि अंगावर गुलाल, शेंदूर फासून त्याला हलगी वाजवायला लावून, त्याची गावातून धिंड काढण्यात आली.
दरम्यान, हा प्रकार सुरु असल्याबाबतची माहिती शिरुर कासार पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, तरुणाची सुटका केली आणि त्याला रायमोहा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
ही संपूर्ण माहिती स्वत: तरुणाने पोलिसांना दिली.
याप्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून 12 जणांचा नामोल्लेख करुन, तर अनोळखी 50 असे एकूण 62 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement