एक्स्प्लोर

व्यभिचारी असल्याचा आरोप करत बलात्कार पीडितेला गावबंदी, बीडमधील तीन गावांचा संतापजनक ठराव

बलात्कार पीडित महिलेवर व्यभिचारी असल्याचा ठपका ठेवत तीन गावांनी तिच्यासह कुटुंबाला हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरं वेशीवर टांगल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली आहे.

बीड : पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरं वेशीवर टांगल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली आहे. बलात्कार पीडित महिलेवर व्यभिचारी असल्याचा आरोप करत पाचेगाव, जयराम तांडा आणि वसंतनगर तांडा या तीन गावांनी तिच्यासह कुटुंबाला हद्दपार करण्याचा ठराव घेतला आहे. एवढंच नाही तर गावकऱ्यांनी या महिलेविरोधात बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातसमोर ठिय्या दिला.

ही महिला गावकऱ्यांना त्रास देते, ती व्यभिचारी आहे, असा आरोप करत तीन गावांनी बलात्कार पीडित महिलेसह तिच्या कुटुंबाविरोधात हद्दपारीचा ठराव मंजूर केला. अत्याचार पीडित महिलेला आधार देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला हद्दपार करण्याचा निर्णय या गावांनी घेतला. या अमानवीय घटनेनंतर सामाजिक स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

2015 मध्ये गावातील चार नराधमांनी संबंधित महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर न्यायालयाने या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली णि हेच गावकर्‍यांच्या जिव्हारी लागलं जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर गावातून या पीडित महिलेला त्रास सुरू झाला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला कहर म्हणजे ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या महिलेचा वागणुकीवर संशय घेत गावातून हाकालण्याचा आणि तडीपार करण्याचा ठराव 15 ऑगस्ट ला घेतलाय।।

यानंतर न्यायालयीन लढा देत आपल्या तक्रारीवर ठाम राहून महिलेने चारही दोषींना जन्मठेपेपर्यंत पोहोचवलं. पण हीच गोष्ट गावकऱ्यांच्या जिव्हारी लागली. या महिलेला गावातच त्रास सुरु झाला. तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला. कहर म्हणजे ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तिच्या वागणुकीवर संशय घेत 15 ऑगस्ट रोजी तिला गावातून हाकलण्याचा ठराव मंजूर केला. आश्चर्य म्हणजे म्हणजे ज्या ग्रामपंचायतींनी गावबंदीचा ठराव मंजूर केला त्या तिन्ही गावांच्या सरपंच या महिलाच आहेत.

ही महिला सध्या पाचेगावमध्येच राहते. बलात्कार प्रकरणातील चारपैकी दोन आरोपी जयराम तांडा आणि वसंतनगर तांडा इथे होते. त्यामुळे पाचेगावसह इतर दोन गावात सुद्धा या महिलेला राहायला जागा मिळू नये यासाठी तिन्ही गावांनी हद्दपारीचा ठराव मंजूर केला.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. पण ज्या ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर केला, त्याची आता जिल्हा परिषदेकडून तपासणी होणार आहेत. त्यानंतर ठराव कोणत्या परिस्थितीत आणि कसे मंजूर केले याची भविष्यामध्ये चौकशी होऊ शकते.

महिलेविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दरम्यान पाण्याच्या कारणावरुन महिलेने मागील आठवड्यात गावातील ग्रामपंचायत सदस्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. यावरुन कर्मचाऱ्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तर महिलेविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून तिला अटक करण्याची मागणी गावकरी करत आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget