एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी टाकलेला भराव ढासळला
आष्टी तालुक्यातल्या पिंपळा गावानजीक रेल्वेमार्गावरील 50 फूट उंचीवरील पुलाचा भराव रेल्वे सुरु होण्याआधीच ढासळला आहे.
बीड : बीड जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे नियोजित अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी टाकण्यात आलेला भराव ढासळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अहमदनगर-बीड-परळी या नियोजित रेल्वेमार्गासाठी भराव टाकण्यात आला आहे. सध्या बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यातल्या पिंपळा गावानजीक रेल्वेमार्गावरील 50 फूट उंचीवरील पुलाचा भराव रेल्वे सुरु होण्याआधीच ढासळला आहे.
या रेल्वेमार्गावर रेल्वे धावायला आणखी बराच कालवधी लागणार आहे. अहमदनगर-बीड हा रेल्वे मार्गाचा टप्पा दोन वर्षांत, तर बीड-परळी हा टप्पा तीन वर्षात पूर्ण होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. मिश्रा यांनी फेब्रुवारी महिन्यात दिली होती.
दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी सर्वाधिक 780 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पहिल्या वर्षी 159 कोटी, दुसऱ्या वर्षी 300 कोटी आणि आता 780 कोटींची तरतूद रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. याशिवाय राज्य सरकारचा वाटा या तरतुदीव्यतिरिक्त असणार आहे.
संबंधित बातम्या :
अहमदनगर-बीड-परळी रेल्वेला गोपीनाथ मुंडे यांचं नाव
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग लवकरच दृष्टीक्षेपात!
अहमदनगर-बीड-परळी मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे इंजिन धावलं!
अहमदनगर-बीड-परळी नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचा पंतप्रधानांकडून आढावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
भविष्य
क्रिकेट
Advertisement