धक्कादायक! अभिनेते सयाजी शिंदेंच्या 'देवराई प्रकल्पाला' भीषण आग, हजारो झाडं जळून खाक, अग्निशामक दल घटनास्खली दाखल
अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांनी उभारलेल्या देवराई प्रकल्पातील ( Devarai project) काही झाडांना आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे.
बीड: अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांनी उभारलेल्या देवराई प्रकल्पातील ( Devarai project) काही झाडांना आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. सयाजी शिंदे यांनी मागील काही वर्षांपूर्वी बीड (Beed) जिल्ह्यातील पालवण जवळ देवराई प्रकल्प उभा केला होता. याच ठिकाणी अचानक ही आग लागली आहे. नेमकी आग कशामुळं लागली याबाबतची अद्याप माहिती मिळाली नाही.
अग्निशामक आणि वन विभागाच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु
दरम्यान, यापूर्वी देखील असाच काहीसा प्रकार समोर आला होता. दरम्यान आज पुन्हा एकदा या ठिकाणी आग लागली आहे. अग्निशामक आणि वन विभागाच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहेत.
वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच आग मोठ्या प्रमाणात भडकली
मिळालेल्या माहितीनुसार, या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे डोंगरावरील हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीवर या आगीमुळे अक्षरशः पाणी फेरलं गेलं आहे. आज सायंकाळच्या सुमारास पालवन डोंगररांगेत अचानक धुराचे लोट दिसू लागले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच या आगीने संपूर्ण सह्याद्री देवराई प्रकल्पाला वेढले. ही आग इतकी भीषण होती की, दुरूनच आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत होता. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने वन विभागाला याची माहिती दिली.
ओसाड डोंगराला हिरवागार करण्यासाठी सयाजी शिंदेंनी घेतलं होतं परिश्रम
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ताफा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक ग्रामस्थ आणि वन कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, उन्हाळ्याचा काळ आणि वाळलेले गवत यामुळे आग विझवण्यात मोठे अडथळे येत आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी या ओसाड डोंगराला हिरवागार करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावलं होतं. विशेष म्हणजे कडक उन्हाळ्यातही पाण्याचे टँकर लावून इथली झाडे जगवण्यात आली होती. या देवराईत अनेक दुर्मिळ भारतीय वृक्षांची जोपासना केली जात होती. या घनदाट जंगलामुळे परिसरात विविध पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला होता.
महत्वाच्या बातम्या:























