एक्स्प्लोर
Advertisement
महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी बीड पोलिसांचं कवच, 'माझा'च्या रिअॅलिटी चेकमध्ये पोलिस पास
रात्रीच्या वेळी मुली अथवा महिला कामाच्या निमित्ताने कधी बाहेर गावी गेले असतील, अथवा शहराच्या कोणत्या निर्जनस्थळी असतील तर त्यांनी पोलिसांना संपर्क करावा, यासाठी बीड पोलिसांनी 1091 हा टोल क्रमांक ठेवला आहे.
बीड : हैदराबादमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी कवच कक्षाची स्थापना केली आहे. रात्रीच्या वेळी मुली किंवा महिलांना असुरक्षित वाटत असेल आणि त्यांना मदतीची गरज असेल तेव्हा त्यांनी पोलीस कंट्रोल रुम की संपर्क करावा, आम्ही तात्काळ तिथे हजर राहून मदत करु, असं पोलिसांनी कळवलं होतं. याचा रिअॅलिटी चेक एबीपी माझाने केला आहे.
रात्रीचे अकरा वाजले होते बीड शहरा लगत असलेल्या या खंडेश्वरी मंदिराच्या परिसरामध्ये दोन मुली स्कूटीवरुन जात असताना, त्यांची स्कूटी अचानक बंद पडते. रस्त्यावर स्मशानशांतता असते. त्या गाडीत चालू करण्याचा प्रयत्न करतात, मात्र गाडी चालू होत नाही. भेदरलेल्या अवस्थेतील या मुली अशावेळी पोलिसांच्या कवच कक्षाला संपर्क करतात आणि मदतीची मागणी करतात.
कंट्रोल रुमला लावलेल्या फोननंतर पोलिसांनी या मुलींचं आधी लोकेशन घेतलं. त्यानंतर आजूबाजूला कोणी आहे का याची चौकशी केली. विशेष म्हणजे पोलिसांनी यावेळी आपला फोन कट न करता या मुलींशी संपर्क कायम ठेवला. जोपर्यंत पोलिस या मुलींपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत फोन चालू होता आणि अवघ्या सात मिनिटाच्या मध्ये पेठबीड पोलिस कर्मचारी या मुलींच्या मदतीला धावून आले.
पोलिसांनी निर्माण केलेल्या कवच कक्षाची खातरजमा करण्यासाठी 'एबीपी माझा'ने पेशाने वकील असलेल्या विशाखा जाधव आणि रवीना सवई या दोन मुलींना सोबत घेऊन हा प्रयोग केला. विशेष म्हणजे पोलिस या मुलींजवळ पोहोचेपर्यंत याची कोणतीही माहिती त्यांना देण्यात आली नव्हती. 'एबीपी माझा'च्या रिअॅलिटी चेकमध्ये बीड पोलिस तात्काळ मुलींच्या मदतीसाठी धावून आले.
रात्रीच्या वेळी मुली अथवा महिला कामाच्या निमित्ताने कधी बाहेर गावी गेले असतील, अथवा शहराच्या कोणत्या निर्जनस्थळी असतील तर त्यांनी पोलिसांना संपर्क करावा, यासाठी बीड पोलिसांनी 1091 हा टोल क्रमांक ठेवला आहे. विशेष म्हणजे अडचणीत असलेल्या महिलांना मदत करण्यासाठी बीड पोलिसांनी प्रत्येक पोलिस स्टेशनला एका महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. केवळ मदतच नाही तर या महिला किंवा मुलींना घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा पोलिसांनी घेतली आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात बीड पोलिसांनी तयार केलेले हे कवच खरंच आज महिलांसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करत आहे हे मात्र नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement