एक्स्प्लोर

Beed : दर्ग्याच्या जागेवरचा पंधरा कोटींचा मावेजा लाटण्यासाठी वक्फ बोर्डाच्या जमिनीवर केलं प्लॉटिंग, बीडमधील धक्कादायक प्रकार

बीडमध्ये एका दर्ग्याच्या जमीनीवर आलेला 15 कोटी रुपयांचा मावेजा बळकवण्यासाठी प्लॉटिंग केल्याचं समोर आलं असून यामध्ये महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. 

बीड: मराठवाड्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनी धनदांडग्या लोकांनी बळकावल्याची बातमी ताजी असतानाच अशाच प्रकारचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. बीडमध्ये चक्क एका दर्ग्याच्या जमिनीवर आलेल्या पंधरा कोटी रुपयांचा शासनाचा मावेजा बळकावण्यासाठी त्या जमिनीवर प्लॉटिंग पाडून विकण्याचा घाट महसूल विभागामधील काही अधिकाऱ्यांनी घातल्याचं समोर आलं आहे. या विरोधामध्ये आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

खिदमतमास जमीन असताना बनावट दस्तावेज बनवून उपजिल्हाधिकारी आघाव यांनी मदतमास करून खालसा केली. बीड शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली दर्गाची 796 एक्कर 37 गुंठे जमिनीपैकी 405 एकर 5 गुंठे जमीन, बनावट दस्तावेज तयार करून खालसा केलीय. भूमाफियांनी यामधील काही जमिनीवर प्लॉटिंग करून जमीन विकली असल्याचं देखील समोर आलं आहे. दरम्यान, या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात असून या जमिनीमधून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने, तब्बल 15 कोटी रुपयांचा मावेजा शासन दरबारी पडून आहे. त्यामुळं आरोपी भूमाफियांनी हा मावेजा उचलण्यासाठी नामी शक्कल लढवली असल्याचं तक्रारीत म्हटलंय. या संदर्भात मूळ तक्रार  सादेक बाबामिया इनामदार यांनी केली होती. दोषींवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली.

बीड जिल्ह्यात देवस्थान व मुस्लिम धार्मिक स्थळ, वक्फ बोर्डची जमीन हडपल्या प्रकरणी महसूल मधील बड्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यात तीन गुन्हे दाखल झाले असतांना आता चौथा गुन्हा देखील दाखल झाला आहे. बीड शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली दर्ग्याला गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. दर्गाची तब्बल 405 एक्कर जमीन बनावट दस्तऐवज बनवून, महसूलमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने भूमाफियांनी लाटली आहे. याप्रकरणी बीडमधील महसूलच्या उपजिल्हाधिकारी यांच्यासह 15 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा वक्क बोर्ड अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून मुस्लिम धार्मिक स्थळ दर्गा, जमीन गैर व्यवहार प्रकरणी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याच्यासह,15 जणांवर गुन्हा दाखल झालाय. यामध्ये तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव-पाटील यांच्यासह हबीबोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी,रशीदोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी, कलीमोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी, सलीमोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी, अशफाक गाँस शेख, अजमतुल्ला पि. रजाउल्ला सय्यद,अजीज उस्मान कुरेशी, महसूल साहय्यक खोड, महसुल सहाय्यक मडंलिक, मंडळ अधिकारी पी.के.राख तत्कालीन तलाठी हिंदोळे, पी एस.आंधळे तत्कालीन तहसिलदार व अभिलेख विभागातील महसूल अधिकारी या 15 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Embed widget