एक्स्प्लोर

बीडमधील केज जवळ बर्निंग कारचा थरार, कार जळून खाक  

Beed News Update : लातूर-बीड रस्त्यावर कुंबेफळ जवळ कार जळून खाक झाली आहे. पेट घेतलेल्या कारमध्ये डिझेल असल्यामुळे या कारच्या जवळ जाण्याचे कोणीही धाडस करत नव्हते.

Beed News Update : लातूरहून केजकडे निघालेल्या कारने पेट घेतल्याने कार जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारच्या एसीमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच गणेश महापूरकर यांनी गाडी थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

लातूर-बीड रस्त्यावर कुंबेफळ जवळ या कारने पेट घेतला. पेट घेतल्यानतंर काही वेळातच परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळाले. पेट घेतलेल्या कारमध्ये डिझेल असल्यामुळे या कारच्या जवळ जाण्याचे कोणीही धाडस करत नव्हते.

लातूर येथे चार्टर्ड अकाउंटंट असलेले गणेश महापूरकर हे आपल्या कुटुंबासोबत सकाळीच लातूरहून निघाले होते. साधारण शंभर किलोमीटर आल्यानंतर अचानक कुंबेफळ गावाच्या नजीक कारच्या एसीतून धूर निघत असल्याचे  त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे महापूरकर यांनी तत्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली आणि कारमधील सर्वांना खाली उतरण्यास सांगितले. गणेश महापूरकर यांच्यासोबत इतर चार जण कारमधून खाली उतरले आणि अवघ्या काही सेकंदामध्ये कारने पेट घेतला. दैव बलवत्तर म्हणूनच यावेळी कार लॉक झालेली नव्हती. 

पेट घेतल्यानंतर महापूरकर यांनी कारचे बोनट उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते लॉक झाले होते, त्यामुळे आगीचा अंदाज येत नव्हता. अर्धा ते पाऊन तास ही आग अशीच धुमसत होती. पाऊन तासानंतर संपूर्ण कार जळून खाक झाली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून वेळीच प्रसंगावधान साधल्याने गणेश महापूरकर यांच्यासोबतच इतर चार जणांचे प्राण वाचले. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याची अद्याप माहिती मिळाली नाही. 

महत्वाच्या बातम्या

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Embed widget