गेवराईजवळ भीषण अपघात, 'वंचित'च्या लातूर जिल्हाध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचा मृत्यू
बीडच्या गेवराई शहराजवळ झालेल्या भीषण अपघातातमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह इतर तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड : बीडच्या गेवराई शहराजवळ झालेल्या भीषण अपघातातमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह इतर तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. यात एक जण गंभीर आहे. हा अपघात इतका भयानक होता यावेळी कारमधून जात असलेल्या चौघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असताना कार चालकाचा ताबा सुटल्याने समोरुन आलेल्या टँकरला धडकली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच तर दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. एक गंभीर जखमी असून त्यावर बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज सकाळी दहा वाजता वंचित बहुजन आघाडीचे लातूरचे जिल्हाध्यक्ष सदशिव भिंगे, सुभाष भिंगे, व्यंकट सकटे, सदाशिव गर्दे, राम भिंगे हे कारने लातूरहून औरंगाबादला जात होते. गेवराई शहरातील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठीमागे गाडीच्या चालकाचा ताबा गाडीवरून सुटला आणि समोरून येणाऱ्या इंडियन ऑईलच्या टँकरला जोराची धडक बसली. यामध्ये जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व सुभाष भिंगे यांचा जागीच मृत्यू झाला तर व्यंकट सकटे, सदाशिव गर्दे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राम भिंगे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत..
हा अपघात इतका भीषण होता की, टँकरच्या धडकेत गंभीर मार लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये मृतदेह अडकून पडले होते. शिवाय कारचा पुढील भाग दबून गेला.या अपघातानंतर महामार्गावरील वरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त कार ही रस्ता ओलांडून डिव्हायडर तोडून टँकरवर जाऊन आदळली.