एक्स्प्लोर

बालकाने पालकाला शिकवू नये, आमदार विजयसिंह पंडितांचा योगेश क्षीरसागरांना टोला, म्हणाले, पाठीत बालकानं पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलं 

राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका केलीय. बालकाने पालकाला शिकवण्याची गरज नाही, एखादा बालक दादांना ज्ञान देतो हे हास्यास्पद असल्याचे पंडीत म्हणाले. 

Beed : नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील राजकारणात (Beed Politics) उलथापालथ होत असल्याचं दिसून येतंय. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) मोठा धक्का बसला आहे. बीडमधील राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचे बंधू योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) यांनी अजित पवार यांची साथ सोडली असून त्यांनी भाजपाचं कमळ (BJP Join) हाती घेतलं आहे. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित ( MLA Vijaysinh Pandit)  यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका केलीय. बालकाने पालकाला शिकवण्याची गरज नाही, एखादा बालक दादांना ज्ञान देतो हे हास्यास्पद असल्याचा टोला देखील पंडीत यांना लगावला आहे. 

कार्यकर्त्यांना खिंडीत गाठून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम या बालकाने केले 

योगेश क्षीरसागर यांच्या टीकेला विजयसिंह पंडित यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बालकाने पालकाला शिकवण्याची गरज नाही एखादा बालक दादांना ज्ञान देतो हे हास्यास्पद असल्याचे म्हणत पंडितांनी खोचक टीका केली. राष्ट्रवादीमधील घडी विस्कटलेली नसून त्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्याच कार्यकर्त्यांना खिंडीत गाठून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम या बालकाने केले आहे. तर त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्र सुरु आहे. मात्र राजीनामा देणारे त्यांचेच कर्मचारी असल्याचं पंडित यांनी यावेळी म्हटलं आहे. 

बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्टरावादी  शिंदेंच्या शिवसेनेला आणि मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेला सोबत घेणार

दरम्यान, बीड नगर परिषदेसाठी अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ठरले आहे. शिंदेंच्या शिवसेनेला आणि मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेला सोबत घेऊन नगरपालिकेसाठी तीन पक्षांची आघाडी करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या 52 जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी सर्व उमेदवार ठरले असून पक्षाकडे यादी पाठवण्यात आली आहे. उद्या यावर शिक्कामोर्तब होणार असून उमेदवारी अर्ज देखील दाखल केले जाणार असल्याची माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरु झाले आहे. उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्यात 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Beed : बीडमध्ये अजितदादांना मोठा धक्का, आमदार संदीप क्षीरसागरांच्या बंधूंनी साथ सोडली, पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश

 

 

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget