एक्स्प्लोर

Beed : बीडमध्ये अजितदादांना मोठा धक्का, आमदार संदीप क्षीरसागरांच्या बंधूंनी साथ सोडली, पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश

Yogesh Kshirsagar Beed : योगेश क्षीरसागर यांनी त्यांच्या पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवारांनी विजयसिंह पंडित यांच्याकडे सूत्रे दिल्यानंतर ते नाराज झाले होते.

बीड : नगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं बीडमधील राजकारणात (Beed Politics) उलथापालथ होत असल्याचं दिसून येतंय. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) मोठा धक्का बसला आहे. बीडमधील राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचे बंधू योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) यांनी अजित पवार यांची साथ सोडली असून त्यांनी भाजपाच कमळ हाती घेतलं आहे. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. योगेश क्षीरसागर आता भाजपच्या चिन्हावर नगरपालिका निवडणूक लढवणार आहेत.

राष्ट्रवादी सोडण्यामागे काही कारणं होती, आता आता मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे असं योगेश क्षीरसागर म्हणाले. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं.

Beed Nagarpalika Election : कमळ चिन्हावर निवडणूक लढणार

सोमवारी नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे योगेश क्षीरसागर हे आता भाजपाच्या चिन्हावर बीड नगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत. यापूर्वी योगेश क्षीरसागर यांचे वडील डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची बीड नगरपालिकेवर गेल कित्येक वर्ष निर्विवाद सत्ता राहिलेली आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर योगेश क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करतोय. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आधीपासूनच तयारी करत होतो. आता आपण भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढत आहोत. बीड नगरपरिषदेचे जागा महिलेसाठी राखीव आहे. त्यानुसार कमळावर आम्ही निवडणूक लढू. भाजप आणि आमचे कार्यकर्ते एक युनिट म्हणून काम करू."

Vijaysingh Pandit : बीडची सूत्रं विजयसिंह पंडित यांच्याकडे

बीडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देताना योगेश क्षीरसागर यांनी पक्षांतर्गत आपली नाराजी बोलून दाखवली. मी माझ्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. मला विनाकारण विरोध केला गेला. पक्षाचे पदाधिकारी नेमताना मला कुठेही विश्वासात घेण्यात आले नाही. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी देखील बोललो अशी खंत योगेश क्षीरसागर यांनी बोलून दाखवली.

अजित पवारांनी बीड नगर परिषदेची सूत्रं ही गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे दिल्याने योगेश क्षीरसागर नाराज झाले. बाहेरचे लोक बीडमध्ये येऊन वेगवेगळ्या निवडणुकीत प्रयोग करणं कायम बीडकरांनी हाणून पाडले. हा प्रयोग सुद्धा बीडकर हाणून पाडतील, आपला स्वाभिमान जागा ठेवतील असा विश्वास योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचा:

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Embed widget