Beed Crime : परळीत तीन गावठी पिस्तुलांसह दोन आरोपी ताब्यात; एका महिन्यातील पोलिसांची तिसरी कारवाई
Beed Crime News : परळी शहरात दोघांकडून तीन गावठी रिव्हॉल्व्हर जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. आजच्या कारवाईत दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं जेरबंद केलं आहे.
Beed Crime News : बीड जिल्ह्यात गावठी पिस्तुल सारखं घातक शस्त्र विक्री करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. परळी पोलिसांनी एका महिनाभरात तिसऱ्यांदा गावठी पिस्तुल विकतान ताब्यात घेतलं आहे.
बीड जिल्ह्यामध्ये वाळूमाफियापासून गुटका माफियांपर्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा वावर वाढताना पाहायला मिळत असतानाच आता तर चक्क शस्त्रास्त्रांचीसुद्धा तस्करी बीडमध्ये केली जाते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आणि त्याचं कारण ठरलं आहे. बेकायदेशीर गावठी रिव्हॉल्वर विकणाऱ्यांवर तीन कारवाया पोलिसांनी अवघ्या एका महिन्यात केल्या आहेत.
परळी शहरात दोघांकडून तीन गावठी रिव्हॉल्व्हर जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. आजच्या कारवाईत दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं जेरबंद केलं आहे. परळीच्या चांदापूर रोडवर गावठी पिस्तुल विकणारे येत असल्याची माहिती डीबी पथकाच्या यंत्रणेला मिळाल्यानंतर त्यांनी यांच्याविरुद्ध सापळा लावला. याची माहिती आरोपींना होताच घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला. यावेळी डीबी पथकातील पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करत मनोज गिते आणि बाळु यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे तीन गावठी कट्ट्यांसह सात जिवंत काडतूसं आढळून आली. या घटनेनं परळी शहरात खळबळ उडाली आहे.
एका वर्षात आठ गावठी पिस्तुलं जप्त
परळीमध्ये एका वर्षाच्या कालावधीत पोलिसांनी आठ पिस्तुलं जप्त केली आहेत. विशेष म्हणजे, यातील बरेचसे पिस्तुल हे विक्री करण्याच्या उद्देशानं आणलं होतं, हे तपासामध्ये पुढे आले आहे.
परळी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन गावठी पिस्तुल आणि सात राऊंड पकडली आहेत. परळी डि. बी. पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये आणि पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष कारवाई केली. यात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून बेकायदा शास्त्र बाळगण्याच्या कायद्यानुसार, त्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या कारवाईनंतर पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये यांनी शहर पोलीस ठाण्यास भेट देऊन कारवाईत सहभागी पोलिसांचे अभिनंदन करून कौतुक केलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha