एक्स्प्लोर
आधी ट्रॅक्टरने धडक, मग डोक्यात दगड; जावयाकडून सासूचा खून, बीडमधील धक्कादायक प्रकार
नवरा-बायकोत असलेली कुरबुरी सोडवण्यासाठी जावयाकडे आलेल्या सासूचा जावयाने आणि त्याच्या वडिलांनी खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या मांडवखेल येथे घडली घडली आहे.
बीड : नवरा-बायकोत असलेली कुरबुरी सोडवण्यासाठी जावयाकडे आलेल्या सासूचा जावयाने आणि त्याच्या वडिलांनी खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या मांडवखेल येथे घडली घडली आहे. दोन जूनला महिलेच्या पतीने नेकनुर पोलिसात पत्नी गायब असल्याची तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांना वेगळाच संशय वाटल्याने त्यांनी या प्रकरणात बारकाईने लक्ष घालण्यास सुरुवात केली. अखेर पोलीस तपासात चक्क जावयाने सासूचाच खून केल्याचे उघडकीस आलं आहे.
बीडच्या वानगावी राहणाऱ्या अलका हनुमंत जोगदंड (वय 40) या आपल्या मुलीकडे 23 मे रोजी गेल्या होत्या. नवरा-बायकोमध्ये कुरबुरी होत असल्याने ते सोडवण्यासाठी अलका जोगदंड या बीडमधील मांडवखेल या ठिकाणी आल्या होत्या. पण पाच सहा दिवस झाले तरीही त्या बीड येथे परत न आल्या नाही. अखेर अलका यांच्या नवर्याने अलका हरवली असल्याची तक्रार 2 जून रोजी नेकनूर पोलीस स्टेशनला दाखल केली. याप्रकरणी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सखोल चौकशी केली असता जावयानेच सासूचा खून केल्याचे उघड झाले .
जावयाने आपल्या सासू अलका यांना प्रथम ट्रॅक्टरने धडक दिला आणि नंतर डोक्यात दगड घालून खून केला. अखेर त्याने सासू अलका यांचं प्रेत शेतात पुरले. काही न घडल्याच्या तोऱ्यात जावई आणि वडील हे दोनही आरोपी पाच ते सहा दिवस वागत होते.
याप्रकरणी नेकनूर पोलिसांनी सचिन तुकाराम कदम (वय 26) आणि तुकाराम रामभाऊ कदम (वय 50) या दोघांना मांडवखेल येथून ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरुद्ध रजिस्टर नंबर 122 /20 कलम .302 ,120 ब, 201 ,34 भा.द वि. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नाशिक
भारत
Advertisement