Beed Crime | लग्नाला नकार दिला म्हणून महिलेच्या डोक्यात दगड घातला
मारहाण झालेल्या महिलेचे लग्न झालेले असून रीतसर घटस्फोट देखील झालेला आहे. आता ती तिच्या वडिलांकडे राहते. लग्नाला नकार दिला म्हणून आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

बीड : एका विवाहित महिलेने लग्नाला नकार दिला म्हणून आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली असून बीड जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बीड शहरातील सायंकाळी पेठ बीड भागात घडली. आरोपी मात्र अद्याप फरार आहे.
सुनील दत्तात्रय जाधव असे आरोपीचे नाव असल्याचे जखमी महिलेने सांगितले. पीडित महिला बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी भागात राहते. आरोपी सुनील जाधव आणि पीडित महिला हे एकाच भागात शेजारी शेजारी काही वर्षांपूर्वी राहायचे. यावेळी पीडित महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मागील एक वर्षापासून सुनील दत्तात्रय जाधव हा मुलगा मला छेडछाड करतो यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्याला आम्ही तक्रार दिली होती. पोलिसांनी सुनील जाधव यांना पोलिस ठाण्यात बोलावून एक वेळा समजावूनही सांगितले आहे. तरी देखील तो माझी सतत छेड काढत आहे. त्याच्या छेडछाडी मुळे मी माझे ब्युटी पार्लरचे क्लास देखील अर्ध्यावर सोडलेले आहेत. अशी कैफियत जखमी महिलेने व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बैठका
माझ्या मुलीच्या जीवितास धोका आहे : पीडितेचे वडील
मारहाण झालेल्या महिलेचे लग्न झालेले असून रीतसर घटस्फोट देखील झालेला आहे. आता ती तिच्या वडिलांकडे राहते. 'मागील एक वर्षभरापासून सुनील जाधव हा माझ्या मुलीला सतत छेडतो. आता तर त्याने डोक्यात दगड घालून मारून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मुलीच्या जीवास धोका असून याची दखल बीड पोलिसांनी घ्यावी, अशी मागणीही संबंधित जखमी महिलेच्या वडिलांनी केली आहे.
पीडित महिलेच्या वडिलांनी पोलिसात यापूर्वी तक्रार देऊन सुद्धा पोलिसाने आरोपीला समजावून सोडून दिले. परंतु, त्यानंतर आरोपी सुनील जाधव याची मजल या महिले वर जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत गेली. पोलिसांनी त्यावेळी जर कायद्याचा धाक या आरोपीला दाखवला असता तर आज कदाचित या महिलेवर ही वेळ आली नसती.
संबंधित बातम्या :
Hinganghat Women Ablaze | हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा मृत्यू
हिंगणघाट जळीतकांड | आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
