एक्स्प्लोर

बारामतीत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चक्क प्रतिभा पवार उतरल्या रस्त्यावर...! 

बारामतीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खुद्द प्रतिभा पवार (Pratibha Pawar) रस्त्यावर उतरल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Baramati Traffic Issue: बारामतीत वाहतूक कोंडीने शहरातील नागरिकांसह बाहेरुन येणारे नागरिकही त्रस्त झाले आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खुद्द प्रतिभा पवार (Pratibha Pawar) रस्त्यावर उतरल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  बारामती शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिकांना हैराण केले असून पोलीस प्रशासन, आरटीओ आणि नगरपालिका या वाहतूक कोंडीवर मात करण्यास अपयशी ठरत आहेत. 

या वाहतूक कोंडीचा फटका खुद्द प्रतिभा पवार यांनाही बसला. बारामती शहरातून प्रशासन भवनमार्गे कसब्याकडे निघालेल्या असताना प्रतिभा पवार यांची गाडी वाहतूक कोंडीत अडकली. दहा ते पंधरा मिनिटे वाहतूक कोंडी दूर होत नसल्याचे पाहून स्वतः प्रतिभा पवार गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने वाहनचालकांना सूचना दिल्या. हा फोटो मागच्या 2-3 दिवसातील असल्याचं बोललं जातं आहे. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी प्रतिभा पवार रास्तावर उतरल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी तातडीने हालचाल करून येथील वाहतूक कोंडी दूर केली.

दिवाळीच्या निमित्ताने सर्व पवार कुटुंबातील सदस्य एकत्र येत असतं. गेल्या 2-3 दिवसापासून पवार कुटुंबातील सर्व बारामतीत वास्तव्यास आहेत. पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी आणि शुभेच्छा स्विकारण्यासाठी राज्यभरातून लोक बारामतीत उपस्थित होत असतात. 

बारामतीतील मुख्य चौक असलेला तीन हत्ती चौकात पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांना रिंग रोडचा वापर करावा लागत असल्याने मुख्य चौकात वाहतूक कोंडी होत आहे. 

 मोठ्या संख्येने नागरीक दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच बारामतीचे बस स्टॅण्डचे काम सुरू आहे. त्यामुळे स्टॅण्ड तात्पुरते कसबा या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

त्यामुळे बारामतीतील कारभारी चौक, शिवाजी चौक आणि ढवाण पाटील चौकात ट्रॅफिक जाम होत आहे.. आणि वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.. शिवाजी चौक, ढवाण पाटील चौक आणि कारभारी चौक हे एकाच रास्तावर असल्याने या चौकातील अंतर  300 ते 400 मी असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

सामान्य नागरिकांना रोज या वाहतूक कोंडीचा फटका बसतोच. आता पवार कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तिला देखील या वाहतूक कोंडीमुळं फटका बसला आहे. प्रतिभा पवार यांचा हा फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

ही बातमी देखील वाचा-

Bharat Jodo Yatra: 'समाजात एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न', भारत जोडो यात्रेत शरद पवार होणार सहभागी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget