(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परळी प्रकरणात वाल्मिक कराडांचा हात असल्याचं बोललं जातंय, तपास CBI किंवा CID कडे वर्ग करावा : रोहित पवार
वाल्मिक कराड यांचा परळी खून प्रकरणात हात आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळं हे प्रकरणं सीआयडीकडे किंवा सीबीआयकडे वर्ग करावे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार म्हणाले.
Rohit Pawar : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आमच्यासोबत होते, त्यावेळी त्यांच्याबरोबर वाल्मीक कराड देखील असायचे. आम्हाला वाटायचं हा व्यक्ती त्यांचा भाऊ आहे. त्यामुळं माझा त्यांच्यासोबत फोटो पाहिला मिळत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं. वाल्मिक कराड यांच्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. कारण त्यांचा आजूबाजूला गुंड असतात. खोटे गुन्हे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांवर टाकले जातात असेही रोहित पवार म्हणाले.
वाल्मिक कराड यांचा परळी प्रकरणात हात आहे असंही म्हटलं जातं. तिथले पोलीस योग्य बाजू घेत नाहीत. त्यामुळें आज मी मागणी करतोय की, हे प्रकरणं सीआयडीकडे किंवा सीबीआयकडे वर्ग करावे असे रोहित पवार म्हणाले. परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गिते फरार आहेत. दरम्यान, याप्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. परळीत धनंजय मुंडेंचे मास्टरमाईंड आहेत. वाल्मिक कराड नावाचा त्यांचा कार्यकर्ता आहे. धनंजय मुंडे आमदार असले तरी त्यांच्या मतदारसंघात त्यांचे काहीच चालच नाही, तिथे सर्व दहशत ही वाल्मिक कराडची आहे असे रोहित पवार म्हणाले होते.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून रोज घडणाऱ्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेच्या पूर्णतः बोजवारा उडाला आहे का? असा प्रश्न पडावा एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 30 जून रोजी रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात एक ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हे प्रकरण पैशाच्या व्यवहारातून झाले असल्याचे पोलिस सांगत असले तरी याला राजकीय रंग असल्याची चर्चा आहे. वेळ रात्रीची सव्वा आठ वाजता, ठिकाण परळी शहरातील बँक कॉलनीमधील परिसर. फारशी रहदारी नसलेल्या या भागात लोक घरामध्ये असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज झाला आणि याच गोळीबारामध्ये एक जण जागीच कोसळला. त्यांचं नाव होतं बापू आंधळे (Bapu Andhale Beed) . परळी शहरापासून जवळ असलेल्या मरळवाडी या गावचे सरपंच. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बापू आंधळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता या प्रकरणावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: