Bandatatya Karadkar Issue LIVE : बंडातात्या कराडकरांच्या अडचणी वाढल्या; जागोजागी निदर्शनं, पाहा प्रत्येक अपडेट्स
Bandatatya Karadkar : राज्य सरकारनं (Maharashtra Govt) वाईनच्या निर्णयावरुन महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाहा प्रत्येक अपडेट्स.
LIVE
Background
Bandatatya Karadkar : राज्य सरकारनं (Maharashtra Govt) वाईनच्या निर्णयावरुन महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बंडातात्या कराडकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोलीस त्यांच्या मठावर दाखल झालेत. फलटणच्या पिंपरद इथल्या बंडातात्या यांच्या मठावर पोलीस दाखल झाले आहेत. बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेण्यात आले असून अटक होण्याची दाट शक्यता आहे.
आज सकाळी बंडातात्या यांच्या फलटण येथील मठावर पोलीस दाखल झाले. पोलिसांनी बंडातात्यांसोबत चर्चा केली. दारु आणि महिला नेत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलीस बंडातात्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना पिंपरद येथून फलटण येथे नेले आहे.
बंडातात्या कराडकर यांचा माफिनामा
नेत्यांच्या मुलांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी बंडातात्या यांनी माफी मागितली. बंडातात्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येते होती. गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला होता. बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली होती. त्याशिवाय बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात बेकायदेशीर आंदोलनप्रकरणी सातारा शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर?
साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे 'दंडवत आणि दंडूका' आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात असे सांगताना बंडातात्या कराडकर यांनी आरोप केला होता. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- 'ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला'; अजित पवारांच्या संगतीत उद्धव ठाकरे बिघडले, ह.भ.प. बंडातात्या कराडकरांचा आरोप
- सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये ; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
बंडातात्या कराड यांचे विरुद्ध पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल
पुणे महापालिकेच्या मा. नगरसेविका ऍड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराड यांनी दिनांक ०3.०2.2022 रोजी राजकीय महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचे विरुद्ध पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांचे न्यायालयात खटला दाखल केलेला आहे. सदर प्रकरणात न्यायालयाने सदर प्रकाराची दखल घेऊन आरोपींवर कडक शासन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. प्रस्तुत प्रकरणात फिर्यादी तर्फे ऍड विजयसिंह ठोंबरे, ऍड हितेश सोनार, ॲड दिग्विजयसिंह ठोंबरे व विष्णू होगे काम पाहत आहे.
सोशल मीडियात सातत्यानं बंडा तात्या कराडकर यांचं व्हायरल होणारं वक्तव्य तत्काळ काढून टाकण्याचे महिला आयोगाचे आदेश
सोशल मीडियात सातत्यानं बंडा तात्या कराडकर यांचं व्हायरल होणारं वक्तव्य तत्काळ काढून टाकण्याचे महिला आयोगाचे आदेश
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे सायबर क्राईमला आदेश
"बंडा तात्या कराडकर यांनी माफी जरी मागितली असली तरी त्यांच्यावर कारवाई ही होणारच"
- "अमृता फडणवीस यांची सातत्यानं खालच्या पातळीवरील ट्विट त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची जाणिव करुन देतात त्यांना मनोरुग्ण तज्ज्ञांची गरज आहे"
- अमृता फडणवीस यांनी भाजपला पुरोगामी पक्ष म्हंटल आहे शिवाय महिलांचा सन्मान केला जातो असं देखील म्हंटल आहे मग दिड महिन्यांपूर्वी भाजपच्या महिलांवरील अन्यायाबाबत जो त्यांच्या पक्षाच्या महिला आमदारांनी पाडा वाचला त्याबाबत काय सांगाल
Pune Bandatatya: पुण्यात बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात आंदोलन ABP Majha
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आक्रमक,आयोगाने गंभीर दखल घेतली
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आक्रमक, चाकणकर म्हणाल्या, काल जे बंडा तात्त्या कराडकर यांनी वक्तव्य केलं त्याबाबत महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. 48 तासांत अहवाल सदर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सातारा पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे. त्यानी जरी माफी मागितली असली तरी कारवाई होईल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्यानी मुख्यमंत्री उपुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांबाबत चुकीची वक्तव्य केली आहेत. त्यांनी जो जमाव गोळा केला होता हे देखील चुकीचं आहे. याबाबत देखील कारवाई होईल. आपण आपल्या लेकींबाबत अशी वक्तव्य करत नाही. पहिल्यांदा वक्तव्य करायचं आणि त्यानंतर माफी मागायचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी जी गर्दी गोळा केली होती त्याबाबत देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे
Satara Bandatatya Karadkar: बंडातात्यांना ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु ABP Majha
Satara Bandatatya Karadkar: बंडातात्यांना ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु ABP Majha
ॉ