एक्स्प्लोर

विखे यांच्या आत्मचरित्रात शरद पवार, सेना राजीनामा, पाठीत खंजीर यासह अनेक मुद्यांवर गौप्यस्फोट

पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचे प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान मोदी यांनी केले.या आत्मचरित्रामध्ये अनेक मुद्यावर भाष्य करण्यात आलं आहे.

शिर्डी : पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचे प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान मोदी यांनी केले. बाळासाहेब यांचं सर्वाधिक आयुष्य काँग्रेस पक्षात गेले. मात्र, त्याच पक्षात अनेकदा अंतर्गत गटबाजीचा सामना विखे यांना करावा लागल्याची माहिती पुस्तकातून समोर आलीय. शरद पवार आणि विखे यांच्यातील वाद, सेनेत जाण्याचा व सेना सोडण्याचा निर्णय, राजीव गांधी यांच्या विरोधात फोरम का निर्माण करावा लागला? बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व संबंध कसे होते, मनोहर जोशी आणि शरद पवार यांची मैत्री, आणि आयुष्यात तीन वेळा जीवे मारण्याचा झालेला प्रयत्न यावर भाष्य करण्यात आलं आहे.

या पुस्तकातील महत्वाच्या बाबी एबीपी माझाच्या हाती लागल्या असून अनेक गौफयस्फोट सुद्धा या पुस्तकातून समोर आले आहेत. शरद पवार यांच्या बाबतीत पुस्तकात अनेक प्रसंगावर भाष्य करण्यात आलं असून यामुळेच शरद पवार यांचे बाळासाहेब विखे यांच्या बरोबर कधीच पटले नाही हे दिसून येतंय. तर राजकारणामुळे माझ्यावर तीन वेळा कठीण प्रसंग आल्याची माहिती देताना तिन्ही वेळी मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट विखे यांनी केला आहे.

पुस्तकातील पान नंबर 434, 435 कोणाच्या पाठीत कोणाचा खंजीर?

या पानांमध्ये 1978 साली स्थापन झालेल्या पुलोद सरकार बाबत लिहिलेलं असून पुलोद स्थापन झाल्यानंतरच सत्तेसाठी व सत्तेपुरत राजकरण करण्याची परंपरा सुरू झाल्याच लिहिलं गेलंय. शरद पवार यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची अतिशय चांगली समज आहे, पुलोद सरकारमध्ये ते मुख्यमंत्री झाल्यावर विकास कामांची गती वाढविण्याची त्यांची क्षमता होती, असं कौतुक पुस्तकातून करण्यात आली असली तरी त्यांच्यातील राजकारण्यांन आणि त्यांचा स्वभाव आणि वागणं या सगळ्यावर मात केली असल्याची टीका करण्यात आलीय.

पुस्तकातील पान नंबर 438 व 439 समज, गैरसमज व यशवंतराव चव्हाण

या पानांमध्ये शरद पवार यांना काँग्रेस मध्ये परत घेण्यासाठी मी प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट विखे यांनी केला आहे. 1980 मध्ये इंदिरा गांधी यांची वाढती लोकप्रियता पाहून अनेक नेते पक्षात परतत होते. शंकरराव कोल्हे व मधुकर पिचड यांना मी घेऊन गेलो व इंदिराजींच्या घरी त्यांना पक्ष प्रवेश नक्की झाला. त्यावेळी पिचड पवार यांच्या विरोधात सारखी गरळ ओकत होते. याच काळात अनेकदा यशवंतराव व पवार यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित होत नव्हता. प्रत्येकजण राजकीय सुरक्षा शोधत होता. तीन महिने लोटल्यावर पवारांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून मी इंदिरा गांधी यांना पुन्हा भेटलो, त्यावेळी इंदिराजींनी छोड दो ना अभी, बार बार मिलना अच्छा नही लगता, असे म्हणत पक्ष प्रवेशाला नकारच दाखवला, असाही प्रसंग लिहिलेला आहे.

शरद पवार पहिल्यादा मुख्यमंत्री

पान नंबर 295, शरद पवार पहिल्यादा मुख्यमंत्री झाले तो किस्सा सांगण्यात आलाय. 1978 मध्ये पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर मी शंकरराव चव्हाण यांच्याबरोबर होतो. हा आकस मनात ठेवून माझ्या प्रवरा कारखान्याचे 12 वर्षांचे ऑडिट सुरू केले. माणूस विचारांनी किती मोठा असला तरी राजकीय स्पर्धेत लहान होतो हेच पवारांनी दाखवून दिले. ऑडिट करूनही काही निष्पन्न न झाल्याने 1988 साली पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर असाच प्रयत्न करून पाहिला मात्र तेव्हाही काही गैर सापडले नाही.

मनोहर जोशी व पवार मैत्री

जोशी व पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध जगजाहीर आहेत. खरं तर युती सरकारच्या काळात सुधीर जोशी मुख्यमंत्री होणार होते. पण मनोहर जोशींनी पवारांच्या मदतीने बरोबर जमवले. त्यांचे डावपेच त्यांनाच माहीत. मी काँग्रेसमध्ये असताना मनोहर जोशी यांनी मलाही सल्ला दिला. पवारांशी कशाला भांडायच, राजकारणात कशासाठी व्यक्तिगत शत्रुत्व मानायचं? तुम्हीही जुळवून घ्या मात्र मी फक्त बघू अस एवढंच उत्तर दिलं. याच रहस्य मला राधाकृष्ण विखे सेनेकडून उभा असताना समजलं. राधाकृष्णच्या विरोधात धनंजय गाडेकर यांनी बंडखोरी केली व ती करण्यामागे खुद्द मनोहर जोशींचाच हात होता. त्यानंतर मी राधाकृष्णला सावध केलं.

शिवसेना प्रवेश आणि किस्से मी काँग्रेस पक्षातून निलंबित असल्यानं पक्षाच वलय माझ्यामागे नव्हतं अपक्ष राहून सक्रिय राजकरण अवघड आहे हे सुद्धा समजून येत होतं. 95 साली मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यावर राधाकृष्ण विखे काँग्रेसचा आमदार असताना सेनेत येण्याची गळ घालू लागले. त्याला आकर्षक पद देण्याचंही मान्य केलं व राधाकृष्णला ती ऑफर आकर्षक वाटली आणि तो सेनेत गेला. पोट निवडणुकीत विजय मिळवून मंत्रीही झाला. राधाकृष्णचं सेनेत जाणं कितपत योग्य याबद्दल मी साशंकच होतो. मात्र, मुलगा सेनेत आणि बाप सेनेपासून दूर हे बापलेकांच नाटक अशी चर्चा सूरु झाली आणि परिस्थितीच्या रेट्याखली मला सेनेत जावंच लागलं.

प्रवेश घेण्याअगोदर मी बाळासाहेब ठाकरेंशी चर्चा केली. माझी राजकीय विचारधारा भिन्न असल्याचा मुद्दाही सांगितला. त्यावेळी बाळासाहेबांनी तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार काम करा, आम्ही तुम्हाला अडवणार नाही, असं सांगितल्यावर माझा सेना प्रवेश निश्चित झाला.

कावळा बसला आणि फांदी तुटली, शिवसेना राजीनामा

2003 साली शिर्डीत विजया दशमीच्या दिवशी सेनेचं महाअधिवेशन घेण्याचा निर्णय झाला. त्यावेळी मी सेनेत मंत्री होतो. अधिवेशन सुद्धा न भूतो न भविष्यती अस झालं. प्रथमचं सेनेच्या वचननाम्यात ग्रामीण भागातील प्रश्न आले. बाळासाहेब विखेमुळे हे फार चांगलं झालं अशाही प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र, तिथेच माशी शिकली असावी. शिर्डीच्या अधिवेशनानंतर मनोहर जोशी व अन्य काही नेते अस्वस्थ झाल्याचं मला जाणवलं. सेनेत विखे पाटलांची लोकप्रियता वाढतेय हे अनेकांना खटकू लागले. दिल्लीच्या एका बैठकीत तर मनोहर जोशींनी घोषणा करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले, असाच प्रश्न विचारला. हाच मुद्दा सेना प्रमुखांच्या समोरही मांडला. आणि वर्षभरात 2003 च्या मे मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आदेश आला आणि मी मागचा पुढचा विचार न करता राजीनामा पंतप्रधानाकडे पाठवून दिला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget