एक्स्प्लोर

Maratha Reservation : राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना बैठकीला का बोलावलं नाही? त्यांनीही भूमिका मांडली असती: बाळा नांदगावकर

Bala Nandgaonkar On Maratha Reservation : मराठा आरक्षणावर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, या विषयावर सर्वांना विश्वासात घ्यायला हवं असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर मंथन व्हायचं असेल तर सर्वपक्षीय सहकार्याची गरज होती, सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही बोलवायला पाहिजे होतं, त्यांनीही आपलं मत व्यक्त केलं असतं असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) म्हणाले. जरांगेनी उपोषण सोडायला पाहिजे हे सर्वांना वाटतं, मात्र हा मुद्दा सामोपचाराने सोडवायला हवा असंही बाळा नांदगावकर म्हणाले. 

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना बाळा नांदगावकर म्हणाले की, राज्यात सामाजिक राजकीय प्रश्न निर्माण झाला आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, आत्महत्येची प्रकरणं वाढवली आहे, जरांगेंच्या तब्येतीची चिंता सतावते आहे. राज्याचे प्रमुख बैठक बोलवतात तेव्हा प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना बोलवायला पाहिजे. आमदार जरी असले तरी पक्षप्रमुखांनी त्यांची भूमिका मांडली असती मात्र तुम्ही बोलवलंच नाही. सर्वांना बोलवलं असतं तर राज ठाकरे यांनी देखील भूमिका मांडली असती. शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष प्रमुखांनी देखील भूमिका मांडली असती. हा प्रश्न ज्वलंत विषय आहे, त्यामुळे सरकारनं हे बरोबर केलं नाही. 

चार दिवसांचे विशेष अधिवेशन घ्या

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चार दिवसांचे विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी करत बाळा नांदगावकर म्हणाले की, सर्वपक्षीय सहकार्य करणं गरजेचं होतं तर सर्वांनाच बोलवायला पाहिजे होतं. विचारमंथन करणं गरजेचं होतं तर ही लोक देखील येणं गरजेचं होतं. आरक्षणाला कोणी नाही म्हणत नाही, मग चार दिवसांचं अधिवेशन घ्या, त्यात आरक्षण कसं देणार हे देखील कळू द्या. सर्व पक्षीय चर्चा नंतर केंद्राला ठराव पाठवा. सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊ जा, मात्र देणार कसं हे सांगा? विशेष अधिवेशन बोलवत सर्व पक्षीयांची भूमिका येऊ द्या.

जातीला पोट असतं, पोटाला जात नसते, शेवटी रिकामे पोट आहे. ज्यांची चूल पेटत नाही त्यांना आरक्षणाची गरज आहे. राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे, त्यांची स्पष्ट भूमिका आहे. तुम्हाला लोक फसवत आहेत, तेव्हाच राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. सर्वांना विश्वासात घेत सरकारनं मार्ग काढायला हवा. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CM Eknath Shinde In Kolhapur : बदलापुरात आंदोलकांनी सात ते आठ तास रेल रोको केलं; लोकांना वेटीस धरलं, हे कुठलं आंदोलन? सीएम शिंदेंची विचारणा
बदलापुरात आंदोलकांनी सात ते आठ तास रेल रोको केलं; लोकांना वेटीस धरलं, हे कुठलं आंदोलन? सीएम शिंदेंची विचारणा
राहुल गांधी अन् मनोज जरांगेंची भेट होणार का?; पत्रकाराच्या प्रश्नांवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
राहुल गांधी अन् मनोज जरांगेंची भेट होणार का?; पत्रकाराच्या प्रश्नांवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
ऑडी इंडियन भारतात आणली गोल्ड एडिशनची आलिशान 'Audi Q8', डिझाईन, स्पेससह किंमत जाणून घ्या 
ऑडी इंडियन भारतात आणली गोल्ड एडिशनची आलिशान 'Audi Q8', डिझाईन, स्पेससह किंमत जाणून घ्या 
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात, दुचाकीची कारला मागून धडक, कारचं मोठं नुकसान
आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात, दुचाकीची कारला मागून धडक, कारचं मोठं नुकसान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde : बदलापूर प्रकरणावर Eknath Shinde यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले... ABP MajhaPrithviraj Chavan Meet Manoj Jarange : राज्यात हालचालींना वेग, पृथ्वीराज चव्हाण जरांगेंच्या भेटीलाMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 04 PM : 22 August 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Eknath Shinde In Kolhapur : बदलापुरात आंदोलकांनी सात ते आठ तास रेल रोको केलं; लोकांना वेटीस धरलं, हे कुठलं आंदोलन? सीएम शिंदेंची विचारणा
बदलापुरात आंदोलकांनी सात ते आठ तास रेल रोको केलं; लोकांना वेटीस धरलं, हे कुठलं आंदोलन? सीएम शिंदेंची विचारणा
राहुल गांधी अन् मनोज जरांगेंची भेट होणार का?; पत्रकाराच्या प्रश्नांवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
राहुल गांधी अन् मनोज जरांगेंची भेट होणार का?; पत्रकाराच्या प्रश्नांवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
ऑडी इंडियन भारतात आणली गोल्ड एडिशनची आलिशान 'Audi Q8', डिझाईन, स्पेससह किंमत जाणून घ्या 
ऑडी इंडियन भारतात आणली गोल्ड एडिशनची आलिशान 'Audi Q8', डिझाईन, स्पेससह किंमत जाणून घ्या 
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात, दुचाकीची कारला मागून धडक, कारचं मोठं नुकसान
आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात, दुचाकीची कारला मागून धडक, कारचं मोठं नुकसान
मोठी राजकीय उलथापालथ, पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा, नेमकं काय घडलं?
मोठी राजकीय उलथापालथ, पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना चांगली, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं कौतुक, पण...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना चांगली, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं कौतुक, पण...
'बदलापूर प्रकरण दाबण्याचं काम', माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला फटकारलं म्हणाले,
'बदलापूर प्रकरण दाबण्याचं काम', माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला फटकारलं म्हणाले, "जाड चामडीचे सरकार.."
मोठी बातमी :  इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा
मोठी बातमी :  इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा
Embed widget