एक्स्प्लोर

Money Laundering Case :  अनिल देशमुखांच्या जामीनावर उद्या हायकोर्टात पुन्हा सुनावणी, स्वीय सहाय्यक संजीव पालांडेंना दिलासा

Money Laundering Case : मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना  12 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. परंतु, सीबीआयच्या विरोधानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी म्हणजे 22 डिसेंबरपर्यंतल जामीनाला स्थगिती दिली आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (former Home Minister Anil Deshmukh) यांच्या जामीनावर उद्या पुन्हा हायकोर्टात सुनावणी (High Court ) होणार आहे. मात्र, त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांना हायकोर्टाने दिलासा दिलाय. मनी लाँड्रिंग प्रकरणात ( money laundering case) मुंबई उच्च न्यायालयाने संजीव पालांडे यांना जामीन मंजूर केलाय. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी दोन लाख रूपयांच्या जात मुचलक्यावर पालांडे यांना जामीन मंजूर केलाय. मात्र, अनिल देशमुखांप्रमाणेच सीबीआयच्या केसमध्येही अटक असल्यानं तूर्तास कारागृहातून त्यांची सुटका होणार नाही. 

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना  12 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. परंतु, सीबीआयच्या विरोधानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी म्हणजे 22 डिसेंबरपर्यंतल जामीनाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात यंदा सुट्टीकालीन कोर्ट उपलब्ध नसल्यामुळे 3 जानेवारीपर्यंत स्थगिती वाढवण्याची सीबीआयकडून विनंती करणार आहे. आज दुपारी अडीच वाजता न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे सीबीआयने आपला अर्ज तातडीच्या सुनावणीसाठी सादर केला. मात्र यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. 

Money Laundering Case :  ...तर अनिल देशमुखांची सुटका होणार

जामीन अर्जावर निकाल दिल्यानंतर 10 दिवसांच्या आत ही सुनावणी झाली नाही तर अनील देशमुखांचा जामीन लागू होऊन त्यांची कारागृहातून सुटका होईल. 

ईडीने 25 जून 2022 रोजी मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर छापा टाकून झाडाझडती केली होती. PMLA कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील जीपीओ चौक परिसरातील निवासस्थानी तसंच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी देखील त्यावेळी छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीनंतर संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती.  

Money Laundering Case : नोव्हेंबर 2021 पासून देशमुख तुरुंगात

1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Eknath Shinde Deputy CM oath: नाथांचा नाथ एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, शिवसैनिक भारावले
लाडका भाऊ पुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Girish Mahajan Anant Ambani : महाजनाच्या पाठीत प्रेमाचा धपाटा, अनंत अंबानींनी नेमकं काय केलं?Amruta Fadnavis On Devendra Fadnavis Oath ceremony : देवेंद्र फडणवीस जिद्द आणि संघर्षामुळे आज पुन्हा मुख्यमंत्रीHanuman At Oath Ceremony : महायुतीच्या महाशपथविधीसाठी आझाद मैदानावर अवतरले हनुमान!Pavna Lake Youth Drowned : मित्रांना वाटलं मस्ती करतायत, डोळ्यासमोर दोन मित्र बुडाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Eknath Shinde Deputy CM oath: नाथांचा नाथ एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, शिवसैनिक भारावले
लाडका भाऊ पुन्हा
Bhanu Pania : फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Embed widget