एक्स्प्लोर

मोठी बातमी! बदलापूर बाल लैंगिक अत्याचारचे राजधानी दिल्लीत पडसाद; राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडून होणार चौकशी  

बदलापूर येथील दोन चिमूरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेचे पडसाद राजधानी दिल्लीत देखील उमटतांना  दिसत आहेत. राष्ट्रीय बालक आयोगाकडून आता या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे.

Badlapur Case बदलापूर : बदलापूर येथील दोन चिमूरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात तीव्र उद्रेक उमटताना  दिसून आले आहे.  बदलापूर मध्ये या घटनेला हिंसक वळण लागले असून पंत जमावाने रेल्वे स्टेशनवर दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहेत. दुसरीकडे या संतापजनक घटनेचे पडसाद  राजधानी दिल्लीत देखील उमटतांना  दिसत आहेत. राष्ट्रीय बालक आयोगाकडून बदलापूर प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे.  या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल हक्क आयोग (National Commission for Protection of Child Rights) एक पथक बदलापूरला पाठवणार आहे. एकूणच या संपूर्ण संताप जनक घटनेचे पडसाद आता दिल्लीत देखील उमटताना दिसत आहेत. 

राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडून होणार चौकशी  

 केंद्र सरकारच्या माध्यमातून  तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल आयोगाकडून बदलापूर प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. यासाठी स्वतः आयोग एक तपास पथक बदलापूर येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.  पोक्सो सारख्या प्रकरणात तात्काळ गुन्हा नोंद होणे हे फार महत्त्वाचं असतं. असे असताना बदलापूरच्या प्रकरणात पोलिसांकडनं निष्काळजीपणा झाल्याचे प्रथमदर्शी उघडकीस आले आहे.  या प्रकरणाची माहिती आम्ही घेतली असून राष्ट्रीय बाल आयोगाकडनं एक पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी बदलापूर येथे पाठवण्यात येईल. हे पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल.  राज्य शासनाने देखील यावर कारवाई केली असून काही अधिकाऱ्यांची बदली देखील तिथून करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेचा आम्ही स्वागत करतोय.  मात्र या संपूर्ण प्रकाराची  सखोल चौकशी आम्ही देखील करणार असल्याची माहिती बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानगो यांनी दिली आहे.

बदलापूर शहराला पोलीस छावणीचे स्वरुप

बदलापूर स्थानकात काहीवेळ दगडफेक झाल्यानंतर आंदोलक पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर ठिय्या देऊन बसले आहेत. तर दुसरीकडे या आंदोलनाचे लोण शहरभरात पसरले आहे. आज सकाळीच बदलापूर बंदची (Badlapur Crime) हाक देण्यात आली होती. मात्र, बदलापूर स्थानकातील आंदोलन तापल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून काही ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस पथकाकडून शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रुट मार्च काढला जात आहे. आंदोलनाचे लोण आणखी पसरु नये, यासाठी बदलापूरमध्ये मोठ्याप्रमाणावर पोलीस फौजफाटा उतरवण्यात आला आहे. त्यामुळे बदलापूर शहराला सध्या पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. 

संबंधित बातमी:

Badlapur School: “ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6.30 PM TOP Headlines 06.30 PM 29 March 2025Myanmar Earthquake : म्यानमार, थाडलंडमध्ये 'महाभूकंप' अनेक इमारती जमीनदोस्त, पूलही कोसळलेSpecial Report | Disha Salian | वडिलांचं अफेअर, मृत्यूचं कारण? दिशाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय?Special Report | Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbha Mela | कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? वाद मिटला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
Embed widget