भाजपवाले चोरी करुन युद्ध जिंकणारे नामर्द, बच्चू कडूंचा 'प्रहार' म्हणाले, त्यांची पाठीमध्ये सुरा खूपसणारी प्रवृत्ती
पाठीमध्ये सुरा खूपसावा तशी प्रवृत्ती आता भाजपची असल्याचे मत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

Bacchu Kadu Nagpur News : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावर बोलताना प्रहारचे प्रमुख बच्चू कडू म्हणाले की, ते पाप काँग्रेसचेच आहे. त्यांनी ईव्हीएम मशीन आणली नसती, तर हा वटवृक्ष तयार झाला नसता. या वटवृक्षामुळे आमचे घर उध्वस्त करायला लागले आहेत. मी मागेही म्हणालो व्हीव्हीपॅड वर मतमोजणी करा. पण तेवढी मर्दानगी भाजपमध्ये कुठे आहे. ते नामर्द आहेत असे कडू म्हणाले. त्यांना माहित आहे रणभूमीत आपण हरणार. त्याकरिता चोरी महत्त्वाची आहे. हे चोरी करून युद्ध जिंकणारे लोक आहेत. पाठीमध्ये सुरा खूपसावा तशी प्रवृत्ती आता भाजपची असल्याचे कडू म्हणाले.
नैसर्गिक आपत्तीपेक्षा हे सुलतानी संकट जास्त
5 हजार 328 चे सोयाबीन 3 हजार रुपयाला विकावे लागते, अगोदरच पिक कमी आहे, त्यात भाव कमी असल्याचे बच्चू कडू म्हणाले. नैसर्गिक आपत्तीपेक्षा हे सुलतानी संकट जास्त आहे. जणू राज्यकर्ते सुलतान बनले अशी अवस्था असल्याचे कडू म्हणाले. खरेदी केंद्र सुरु नाही. पंजाबमध्ये 90 टक्के माल हमीभावात खरेदी करतात. आपल्याकडे 10 टक्के पण नाही, अशी टीका कडू यांनी सरकारवर केली.
सरकार निर्दयी
सरकार किती निर्दयी झालंय, मुख्यमंत्री विदर्भातील असताना सगळ्यात जास्त पिक सोयाबीनचे आहे. तरीही त्यांना कदर नाही येत नाही.अनुशेषसाठी आरडाओरड करणारे देवेंद्र भाऊ आता दिसत नाहीत. ते पहिला देवेंद्र भाऊ दिसावा हिच अपेक्षा असल्याचे कडू म्हणाले. मुंबई कार्यालयाच्या मुद्यावरुन देखीलकडू यांनी टीका केली. साप पकडल्यावर जहर सोडतो तसा हा प्रकार आहे. गरज सरो वैद्य मरो आणि लगेच विष सोडायला सुरुवात झाल्याचे कडू म्हणाले. आम्ही चूप न बसता आंदोलन करत आहोत. म्हणून त्याचे परिणाम भोगाव लागत आहेत. त्यातील हा एक परिणाम असल्याचे कडू म्हणाले. स्वीकृत सदस्यामध्ये एखाद्या दिव्यांगांना घ्यावे, अनाथांना, विधवा भगिनींना एखादा प्रतिनिधी म्हणून घ्या, फक्त राजकीय ताळमेळीसाठी घेऊ नका असे कडू म्हणाले.
56 इंचची छाती असणारे मोदीजी पंतप्रधान असताना शेतकऱ्यांचे हाल
महसूल मंत्र्याला राजकीय कार्यकर्त्याची व्यवस्था करण्यासाठी स्वीकृत सदस्य कशाला पाहिजे. जो घटक तिथे जात नाही.ज्याची तिथे गरज असते. त्याच्यासाठी स्वीकृत सदस्य घ्यायला पाहिजे. पण एवढी अक्कल येणार कुणाला. तेवढी अक्कल तर पाहिजेना. राजकारणाशिवाय दुसरी अक्कल आहेच नाही असे कडू म्हणाले. 56 इंचची छाती असणारे मोदीजी पंतप्रधान असताना शेतकऱ्यांचे हे हाल आहेत. त्यांनी ट्रम्पच्या इशाऱ्यावर अमेरिकेतला कापूस आयात करत 11 टक्के कमी करुन इथे दरगाठी आणल्या असतील तर यापेक्षा दुर्दैव काय असणार असे कडू म्हणाले.

























