एक्स्प्लोर

आमदारांना पगार नका देऊ, शेतकऱ्यांना मदत करा; आमदार बच्चू कडूंची मागणी

आमदार आणि आयएएस अधिकाऱ्यांना पगार न देता ते पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावेत, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

मुंबई : राज्यातील कोणत्याही आमदाराला पगार देऊ नका, इतकंच नाही तर आयएएस अधिकाऱ्यांनादेखील तीन महिने पगार देऊ नका, परंतु शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं धोरण आखायला हवं, असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

बच्चू कडू सध्या अॅक्शन मोडवर आहेत. एका बाजूला सर्व आमदारांची पगार वाढवण्याची मागणी सुरु असताना दुसऱ्या बाजूला बच्चू कडू मात्र त्यास विरोध करत आहेत. आमदार आणि आयएएस अधिकाऱ्यांना पगार न देता ते पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावेत, अशी मागणी कडू यांनी केली आहे.

राज्यात सत्तेचा खेळ सुरु असताना नोव्हेंबरमध्ये राज्यात 300 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून गेल्या चार वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत एका महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा हा आकडा सर्वाधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्व संस्थांनी एकत्र येऊन याविषयावर एक धोरण आखलं पाहिजे, असेही बच्चू कडू म्हणाले.

उस्मानाबाद : महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत पेन्शन योजना लागू करा यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे असंख्य मोर्चे निघाले. पण सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने मागण्या मान्य होत नाहीत. मात्र महाराष्ट्राच्या विधीमंडळ सदस्याला (आमदाराला) या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे काळजीचं कारण नाही. आर्थिक तंगीमुळं आमदारांच वेतन आणि पेन्शन कमी झालेली नाही. उलट त्यात दरवर्षी वाढ होत आहे.

आमदारांच्या पेन्शन आणि वेतनाची माहिती माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तेव्हापासून सर्वत्र आमदारांच्या वेतनाबाबत चर्चा सुरु आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना आमदारांना पगार-पेन्शनची खैरात का वाटली जात आहे? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.

आमदारांना पगार किती? दोन्ही सभागृहाचे मिळून महाराष्ट्रात 367 आमदार आहेत. प्रत्येक आमदाराला मुळ वेतन 67 हजार रुपये, महागाई भत्ता 91 हजार 120 रुपये, संगणक चालकाची सेवा 10 हजार रुपये, दुरध्वनी सेवा 8 हजार रुपये, टपाल सुविधा 10 हजार रुपये असा एकुण 1 लाख 86 हजार 120 रुपये इतका पगार मिळतो. 367 आमदारांच्या वेतनापोटी वर्षाकाठी सुमारे 79 कोटी 27 लाख 20 हजार रुपये सरकारकडून दिले जातात. हा पगार आणखी वाढवायला हवा. अशी मागणी आमदारांकडून होत आहे.

माजी आमदारांवरील उधळपट्टी किती? शरद काटकारांनी आमदारांच्या पेन्शनची माहिती मिळवली. महाराष्ट्रात 797 माजी आमदार आहेत. एक टर्म (एकदाच) निवडून आलेल्या माजी आमदारांना 50 हजार रुपये पेन्शन मिळते. पुढची प्रत्येक टर्म निवडूण आल्यास पेन्शनमध्ये 5 हजाराची वाढ केली जाते. आमदारांनंतर त्यांच्या कुटुंबियांनाही पेन्शनचा लाभ मिळतो. आमदारांच्या मृत्यूनंतर परिवाराला 40 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते.

आमदारांना, माजी आमदारांना वैद्यकीय बिलं अमर्याद मिळतात. वर्षाकाठी रेल्वे आणि विमानाचा 35 हजार किलोमीटरचा प्रवास मोफत दिल. एसटी पूर्णपणे मोफत असते. विमान आणि रेल्वेचं AC second क्लासचं भाडं दिलं जातं. आमदाराने तिकीट काढून नंतर बिलं सुपूर्द केल्यावर सरकारकडून त्याची परतफेड केली जाते. तसेच आमदाराच्या विवाहसाथी (पत्नी किंवा पती) आणि सहाय्यकालादेखील मोफत प्रवासाची सुविधा पुरवली जाते.

महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे. राज्यावर 6 लाख 71 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी स्वत:चे पगार आणि पेन्शन सोडून द्यावेत, अशी मागणीदेखील लोकांकडून होत आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा पहिल्याच दिवशी दणका, दर्यापूरच्या 2 नायब तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई | ABP Majha सेवा हमी कायद्याचं पालन झालं नाही तर तुमचा सामना माझ्याशी : बच्चू कडू | ABP MAJHA
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget