सोयाबीन काय भावानं खरेदी करणार हे मोदीजी आणि फडणवीस का सांगत नाहीत? बच्चू कडूंचा सवाल, म्हणाले आपल्याला भगतसिंगासारखं लढावं लागेल
आमचं सोयाबीन काय भावाने खरेदी करणार हे पंतप्रधान मोदीजी (Prime Minister Narendra Modi) आणि मुख्यमंत्री फडणवीस ( Devendra Fadnavis) का सांगत नाहीत? असा सवाल प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला.
Bacchu Kadu : आमचं सोयाबीन काय भावाने खरेदी करणार हे पंतप्रधान मोदीजी (Prime Minister Narendra Modi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) का सांगत नाहीत? असा सवाल करत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आमच्या सोयाबीनला 7 हजार रुपयांचा भाव मिळाला पाहिजे, पण चार हजार रुपये मिळत असतील तर 20 हजार रुपये एकर नुकसान होतं आहे. मग आपल्याला राग का येत नाही असेही कडू म्हणाले.
कर्जमाफी आणि हमीभाव दिला नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्ही एका महिन्याचे 1509 रुपये मुख्यमंत्र्यांना पाठवा
आपल्याला हरियाणा, पंजाबसारखं भगतसिंग सारखं लढावं लागेल असेही कडू म्हणाले. ही जात धर्माची लढाई नाही. जर तुम्ही सोबत आले तर भगतसिंग सारखं जिंकू असेही कडू म्हणाले. जर तुम्ही जातीय भांडत असाल तर सरकार तितकंच आरामशीर राहील. आम्हाला जर भाव मिळाला तर देवाभाऊ आम्ही कर्जमाफी मागणार नाहीतर तुमचं कर्ज माफ करु असेही कडू म्हणाले. तुम्ही गरीब राहिले पाहिजे असं नेत्यांना वाटत आहे. सगळ्यांना जाती पातीत गुंतवण ठेवल्या जातं आहे. जर सरकार भाव देत नसेल तर सरकार म्हणून तिथं बसता कशाला? असा सवाल देखील कडू यांनी केला. झेंडा घेऊन आम्हीच मरायचं. माझ्या शेतकऱ्याला भाव द्या. आमदारकी ओवाळून देईल असे कडू म्हणाले. 28 ऑक्टोबरला नागपूरला जायचं मोठ्या संख्येने.चार पाच दिवसाच्या तयारीने जायचं आहे असे कडू म्हणाले. मर किसान मर जवान हा नारा आहे भाजपचा असेही कडू म्हणाले. जर कर्जमाफी आणि हमीभाव दिला नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्ही एका महिन्याचे 1509 रुपये मुख्यमंत्री देवाभाऊला भाऊबीजचे पाठवा असेही कडू म्हणाले.
पोलिसांशी धक्काबुक्की करत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केल्या प्रकरणी माजी खासदार उन्मेश पाटील आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा अन्य कलमा खाली जळगाव मध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शेतकरी प्रश्नावर काल जळगाव मधे जन आक्रोश मोच्याच आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलन करण्यात आले होते,यावेळी निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आंदोलन स्थळी यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र ही मागणी जिल्हाधिकारी यांनी नाकारल्याने माजी खासदार उन्मेश पाटील, बच्चू कडू यांच्या सह मोठा जमाव पोलिसांचा विरोध झुगारून जिल्हाधिकारी कार्यालय येथे घुसला. यावेळी गदारोळ उडाल्याचे पोलिसांनी आज सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा माजी खा उन्मेश पाटील,आणि बच्चू कडूंसह अकरा जणांच्या वर दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

























