एक्स्प्लोर

बच्चू कडू म्हणाले आता कलेक्टरला तोडू तर तुपकर म्हणाले नेपाळसारखं मंत्र्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, दोन्ही नेत्यांचा सरकारला इशारा  

अकोल्यात (Akola) आज 'किसान ब्रिगेड'च्या वतीने 'शेतकरी लूट वापसी संवाद सभा' पार पडली. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू आणि क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.

Akola News : अकोल्यात (Akola) आज 'किसान ब्रिगेड'च्या वतीने 'शेतकरी लूट वापसी संवाद सभा' पार पडली. यावेळी विविध शेतकरी संघटनांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या सभेत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू आणि क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांनी आक्रमक भाषण करत सरकारला इशारा दिला आहे. त्यांच्या वक्तव्याची सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे. आधी जिल्हाधिकारी कार्यालयाचा गेट तोडलं आता थेट कलेक्टरलाच तोडू असा वादग्रस्त वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. तर नेपाळसारखं मंत्र्यांना तुडवल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असं वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. 

यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू,

शहरातील मराठा मंगल कार्यालयात झालेली ही सभा बच्चू कडू आणि रविकातं तुपकर यांच्यामुळं चांगलीच गाजल्याचं पाहायला मिळालं.  या सभेसाठी देश आणि राज्यातील शेतकरी नेते अकोल्यात आले होते. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत, बच्चू कडू, रविकांत तुपकर, प्रकाश पोहरे, अजित नवले, विश्वास उटगी आदी नेते या सभेला उपस्थित होते. या सभेत बोलताना 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या जळगाव येथील आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला. जळगावातील आंदोलनात आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडलं. यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू, असा वादग्रस्त इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी थेट मंत्र्यांना तुडवावं लागेल : तुपकर 

शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी थेट 'जेन-झी' आंदोलनादरम्यान नेपाळमधील घटनेचा उल्लेख केला आहे. यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी थेट मंत्र्यांना तुडवावं लागेल.‌ दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय व्यवस्था जागी होणार नाहीय, असं वादग्रस्त विधान रविकांत तुपकरांनी केलंय. तर, 'भारतीय किसान युनियन'चे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकू नका असं आवाहन केलंय. अकोल्यातील बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांच्या विधानांनी राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव, अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशा मागण्या नेत्यांनी केल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Bacchu Kadu : वर्गणी, सात दिवसाचा शिधा जमा करा; दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंचा पुन्हा आक्रमक पवित्रा, मुंबईत आंदोलनाचा इशारा

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget