तुम्हारी फिल्म बनवा दूंगा, 'एक था MLA', ऐकेकाळी दाऊद इब्राहिमनेही दिली होती बाबा सिद्दीकींना धमकी
Baba Siddique Shot Dead in Mumbai : ऐकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनेही (dawood ibrahim) बाबा सिद्दीकी यांना धमकी दिली होती.
Baba Siddique Shot Dead in Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder case) यांची काल रात्री हत्या करण्यात आली आहे. त्यांचे हत्येनंतर महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी (Police) दोन आरोपींना अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान, अशातच बाबा सिद्दीकी यांना याआधी आलेल्या धमक्यांचीही चर्चा होत आहे. ऐकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनेही (dawood ibrahim) बाबा सिद्दीकी यांना धमकी दिली होती.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने बाबा सिद्दीकी यांना धमकी दिली होती. याबाबतचे वृत्त एका वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले होते. जमिनीच्या वादातून ही धमकी देण्यात आली होती. संजय दत्तचे डी कंपनीसोबत असणारे संबंध आणि बाबा सिद्दिकी यांचे संजय दत्तसोबत असणाऱ्या संबंधामुळं बाबा सिद्दिकीचे अंडरवर्ल्डशीही संबंध असल्याचे अनेकदा आरोप करण्यात आले होते. अशातच दमिनीच्या वादातून दाऊद इब्राहिमसोबतही त्याचे भांडण झाल्याची चर्चा होती.
नेमकं प्रकरण काय होतं?
दाऊद इब्राहिमचा ((dawood ibrahim) जवळचा सहकारी अहमद लंगडा याच्याशी बाबा सिद्दीकी यांचे मुंबईतील एका जमिनीवरुन भांडण झाले होते. त्यानंतर छोट्या शकीलने बाबा सिद्दीकी यांना या प्रकरणापासून दूर राहा अन्यथा आपले नुकसान होईल, अशी धमकी दिली होती. बाबा सिद्दीकी यांचेही चांगले राजकीय संबंध अहोते, त्यामुळे त्यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अहमद लंगडाला अटक करुन तुरुंगात टाकण्यात आलं होतं. यानंतर दाऊद इब्राहिमने बाबा सिद्दीकी यांना फोन करून राम गोपाल वर्मा यांच्याशी बोलून त्यांच्यावर 'तुम्हारी फिल्म बनवा दूंगा, 'एक था MLA'अशी धमकी दिली होती.
मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी (दि.13) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. आरोपींच्या वकिलांकडून आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयात करण्यात येतोय. दरम्यान सरकारी वकिलांनी देखील न्यायालयात युक्तिवाद केला आहे. "या आरोपींकडून 28 जिवंत कातूस सापडली आहेत.
महत्वाच्या बातम्या: