आरोपींकडे 28 जिवंत काडतूस सापडली, बाबा सिद्दिकींना मारण्याचा हेतू की अन्य कोणाला? सरकारी वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी यांची हत्येप्रकरणातील आरोपींना आज (दि.13) हजर करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आलाय.
Baba Siddique Murder Case : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांची शनिवारी (दि.13) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. आरोपींच्या वकिलांकडून आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयात करण्यात येतोय. दरम्यान सरकारी वकिलांनी देखील न्यायालयात युक्तिवाद केला आहे. "या आरोपींकडून 28 जिवंत कातूस सापडली आहेत. मग फक्त बाबा सिद्धीकी (Baba Siddique) यांनाच मारायचा हेतू होता की अन्य ही कोणाला मारण्याचा हेतू होता", असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर न्यायालयात काय युक्तीवाद झाला?
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणाबाबत धर्मराज कश्यप या आरोपीला न्यायमूर्तींनी वय विचारले असता त्याने त्याचं वय 17 असल्याचं सांगितलं आहे. अल्पवयीन आरोपी म्हणून ट्रिटमेंट मिळावी यासाठी आरोपींच्या वकिलांकडून न्यायालयात मागणी करण्यात आली आहे. आरोपींच्या वकिलांकडून देखील त्याचं वय 17 असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. नेमकं वय किती? हे तपासण्यासाठी अल्पवयीन आरोपीचं आधारकार्ड हे न्यायमूर्तींकडून मागवण्यात आलं आहे. आधारकार्डनुसार आरोपीचं वय 19 असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आधारकार्डनुसार त्याचं वय 19 आहे, मात्र यांच्या म्हणण्यानुसार त्याचं वय 17 आहे. आरोपीच्या वकिलांकडे वया बाबत पुरावे नाहीत, असा दावाही सरकारी वकिलांनी केला आहे.
बाबा सिद्दिकी यांनाच मारायचा हेतू होता की अन्य ही कोणाला मारण्याचा हेतू होता?
आरोपी अशा गुन्ह्यात अनेकदा स्वत:च्या बचावासाठी बनावट आधारकार्डही बनवतात, असंही सरकारी वकिलांनी म्हटलं आहे. त्यानंतर आरोपी वयाचा खुलासा व्हावा, यासाठी वैद्यकिय चाचणी करण्यास तयार झाले आहेत. मात्र, सरकारी वकिलांकडून आरोपीच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे. यातील आरोपी पुणे आणि मुंबईत राहून बाबा सिद्दिकी यांची रेकी केली होती. या आरोपींना हत्यार कोणी दिलं, वाहन कोणी दिलं? याचा तपास होणं महत्वाचं आहे. या आरोपींकडून 28 जिवंत कातूस सापडली आहेत. मग फक्त बाबा सिद्दिकी यांनाच मारायचा हेतू होता की अन्य ही कोणाला मारण्याचा हेतू होता? असे सवालही सरकारी वकिलांनी न्यायालयात उपस्थित केले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या