(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाबा सिद्दिकी प्रकरणानंतर केंद्रीय यंत्रणा सावध, शरद पवारांची सिक्युरिटी टाईट करणार
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सीआरपीएफ शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा घ्यावी यासाठी विनंती करणार आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणानंतर केंद्रीय यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्रीय एजन्सींनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा घ्यावी यासाठी संपर्क साधणार आहे. केंद्रीय यंत्रणांनी याआधीही पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली होती मात्र पवारांनी तेव्हा नकार दिला होता. आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा संपर्क केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सीआरपीएफ शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा घ्यावी यासाठी विनंती करणार आहे. आता शरद पवार काय निर्णय घेणार पाहावे लागणार आहे.गेल्या वेळी शरद पवारांना ज्यावेळी सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी मोठं राजकारण झाले होते. शरद पवारांनी देखील केंद्रीय यंत्रणांन कारणे विचारली होती. मात्र सुरक्षा देण्याचे कारण त्यावेळी गुप्त ठेवण्यात आले होते.
शरद पवार काय निर्णय घेणार?
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर थ्रेट परसेप्शन वाढल्याची शक्यता आहे. सीआरपीएफने पुन्हा विनंती करणे म्हणजे काही धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीआरपीएफने पुन्हा सुरक्षा देण्याचा विनंती करणार म्हणजे शरद पवारांना धोका आहे. शरद पवारांना काय धोका आहे? याची माहिती फक्त शरद पवारांना देण्यात आली आहे. दुसऱ्या कुणालाही याबाबत काहीच सांगण्यात आलेलं नाही. आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि पदाचा विचार करता सुरक्षा घेण्यासाठी पवारांशी संपर्क साधला जाणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झेड प्लस सुरक्षा देऊनही शरद पवार यांनी सुरक्षा न घेतल्याने सीआरपीएफचे अधिकारी शरद पवार यांना भेटून याबाबतची माहिती देऊ शकतात.
केंद्रानं देऊ केलेल्या झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांना संशय
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्र सरकारनं Z+ सुरक्षा देऊ केली होती. पण, शरद पवारांनी मात्र, केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केला होता. झेड प्लस सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असं शरद पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा :